Akola ST Bus Fire: Saam Tv
महाराष्ट्र

Akola ST Bus Fire: प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी बस, वाटेत अचानक घेतला पेट; बघता बघता...

Akola ST Bus: अकोल्यात धावत्या एसटी बसने अचानक अचानक पेट घेतला. ही बस आगीमध्ये पूर्णत: जळून खाक झाली. या बसमधून २० पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

अक्षय गवळी, अकोला

अकोल्यामध्ये धावत्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. अकोल्यातल्या अकोट पोपटखेड रस्त्यावर ही घटना घडली. आगीमध्ये बस जळून खाक झाली. या बसमधून २० प्रवासी प्रवास करत होते. बसला आग लागल्यामुळे प्रवासी प्रचंड घाबरले. चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अकोल्यात धावत्या एसटी बसने अचानक अचानक पेट घेतला. शहानुर- अकोल अशी एसटी महामंडळाची ही बस आहे. आज सकाळीच शहानुर इथून बस अकोटसाठी प्रवासी घेऊन रवाना झाली होती. पोपटखेड वरून अकोटकडे जात असतानाच याच मार्गावरील बोर्डी फाट्यावर अचानक बसमधून धूर निघत असल्याचे बस चालकाच्या लक्षात आलं. त्यानंतर बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवले. बघता बघता बसने मोठा पेट घेतला.

आगीमुळे बस पूर्णत: जळून खाक झाली. प्रवाशांच्या वस्तू तसेच एसटी बसचे आगीत मोठे नुकसान झालं. सुदैवाने सर्व बसमधील प्रवासी सुरक्षित आहेत. बस चालकाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान या बसमधून २० प्रवासी प्रवास करत होते असे सांगण्यात येत आहे. या सर्वांचे प्राण वाचले. बसमधील सर्व खुर्च्या आणि इतर वस्तू पूर्णतः जळून खाक झाले. आगीची माहिती आकोटच्या अग्निशमन दलाला देण्यात आली . मात्र अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत पूर्ण बस आगीच्या तावडीत आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बसचे नुकसान झालं.

एसटी बसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आज सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अकोला जिल्ह्यातीलच सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शहानुरवरून पहाटेच ही बस अकोटकडे निघाली होती. मात्र वाटेतच बोर्डी फाट्याजवळ बसला अचानक आग लागली. परंतू बस चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

SCROLL FOR NEXT