Akola Sarpanch Beaten Saam Tv
महाराष्ट्र

Akola: पेट्रोल पंपावर सरपंचाला बेदम मारहाण, घटना CCTV मध्ये कैद; पाहा थराराक VIDEO

Akola Sarpanch Beaten: अकोल्यामध्ये सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. पेट्रोल भरण्यावरून वाद झाला त्यानंतर दोघांनी सरपंचाला मारहाण केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

Priya More

Summary -

  • अकोल्यातील पेट्रोल पंपावर सरपंचाला बेदम मारहाण.

  • रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून वादातून हल्ला.

  • सीसीटीव्हीमध्ये मारहाणीची संपूर्ण घटना कैद.

  • पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

अक्षय गवळी, अकोला

अकोल्यामध्ये पेट्रोल पंपावर सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातल्या बुब पेट्रोल पंपावर ही घटना घडली. मारहाणीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या घटनेमुळे अकोल्यामध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुर्तीजापूर पोलिस ठाण्यामध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर शहरातील गाडगे बाबा चौक शासकीय विश्रामगृहासमोरील बुब पेट्रोल पंपावर निंबा गावचे सरपंच प्रदीप फुके हे दैनंदिन कामे आटपून गावी जात होते. वाटेतच पेट्रोल भरण्यासाठी ते पेट्रोल पंपावर थांबले. याचवेळी रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून त्यांचा आणि एका दुचाकीस्वाराचा वाद झाला. या वादादरम्यान सरपंच प्रदीप फुके यांना दुचाकीस्वार आणि त्याच्या मित्राने मारहाण केली. या मारहाणीमध्ये सरपंच जखमी झाले आहेत. हा मारहाणीचा प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला.

या प्रकरणी मुर्तीजापूर शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मारहाण नेमकी रांगेत उभे राहण्यावरून झाली की आणखी काही कारण होते याचा तपास पोलिस करत आहेत. किरकोळ कारणावरून सरपंचाला मारहाण केल्याच्या या घटनेची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या सरपंचाला रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास मुर्तीजापूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर राणे करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: कोचकडून महिला खेळाडूवर बलात्कार, हॉटेलवर सरावासाठी बोलावलं अन्...; करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी

'V' Neck ब्लाउजची क्रेझ; साडीला देईल रॉयल लूक, पाहा ट्रेंडी डिझाइन्स

Maharashtra Live News Update: हिंगोलीच्या औंढा शहरात गटविकास अधिकाऱ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड

Viral Video : एकमेकींचे केस ओढले, रस्त्यात राडा घातला; प्रचाराचे पैसे न मिळाल्याने महिलांची फ्री स्टाईल हाणामारी

Navi Mumbai : नवी मुंबईच्या लॉजमध्ये नको ते उद्योग, पोलिसांनी उद्ध्वस्त केले देहविक्रीचं रॅकेट; ७ महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT