Akola News Saam Tv
महाराष्ट्र

Akola Railway Platform Accident: रेल्वेत चढताना आईचा तोल गेला, पाठोपाठ लेकीनेही घेतली उडी अन्... थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

Vidarbha News : काळ आला होता पण वेळ आली नव्हती असाच काहीसा प्रकार अकोल्यात घडला आहे.

अॅड. जयेश गावंडे

Akola Railway Station News : अकोला रेल्वे स्थानकावर धावती रेल्वे पकडणं एका महिलेच्या जीवावर बेतणारं ठरलं असतं. परंतु काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असचं काहीस चित्र अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर दिसून आलं. काल (29 मार्च) रात्री साडे ९ वाजताच्या सुमारास एक महिला तिच्या मुलीसोबत मुंबईला जाण्यासाठी धावत्या अमरावती एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती. (Latest Marathi News)

मुलगी रेल्वेत (Railway) चढली खरी, पण पाठीमागे असलेल्या आईचा त्याच वेळी तोल गेल्याने ती रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडली. त्याचवेळी रेल्वे स्थानकावर असलेल्या रेल्वे व्हेंडरसह प्रवाशांनी महिलेला बाहेर ओढलं आणि रेल्वेखाली जाता-जाता महिला थोडक्यात बचावली. इतकंच नव्हे तर आपल्या आईला पडताना पाहताच मुलीनेही धावत्या रेल्वेतून उडी घेतली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाला आहे.

संपूर्ण प्रकरण काय?

वाशिम येथील बेबी मधुकर खिलारे ही तिच्या मुलीसोबत अमरावती एक्सप्रेसने मुंबईला जात होती. काही गोष्टींमुळे रेल्वे स्थानकावर पोहोचायला वेळ झाला त्यामुळ प्लॅटफॉर्मवर वेळेत पोहचू शकले नाही. आई आणि मुलगी दोघेही प्लॅटफॉर्मवर आल्या. तेव्हा अमरावती एक्सप्रेस नुकतीच सुटली होती. तेवढ्यात आई आणि मुलीने रेल्वे पकडण्याचा प्रयत्न केला. अखेर मुलगी रेल्वे चढली, परंतु रेल्वेत चढत असताना तिच्या आईचा पाय घसरला आणि ती रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडली.

मात्र, या ठिकाणी असलेल्या रेल्वे व्हेंडर शंकर स्वर्गे आणि इतर प्रवाशांनी तिला बाहेर ओढलं. अशा प्रकारे तिचा थोडक्यात जीव वाचला. परंतु रेल्वेच्या दरवाज्यातून आपल्या आईला पडताना पाहताच मुलीनेही थोड्या अंतरावरधावत्या रेल्वेतून उडी घेतली, सद्यस्थितीत आई आणि मुलगी दोघेही सुखरुपअसून पुढील प्रवासासाठी रवाना झाले आहेत.

हा संपूर्ण प्रकार अकोला रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान शंकर यांच्या या धाडसी कृत्याचं सर्वत्र कौतूक केलं जातं आहे. अशाप्रकारे १५ सेकंदात ही घटना असून त्या महिलेचा आणि तिच्या मुलीचा जीव वाचला आहे. त्यानंतर अवघ्या २० सेकंदात रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

Skip Lunch Effect: जेवण टाळणं म्हणजे आजारांना निमंत्रण? जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT