Akola Saam
महाराष्ट्र

Akola News: ठाकरेंच्या नेत्याविरोधात खंडणीची तक्रार करणारा अधिकारीच गोत्यात? महिलांकडे शरीरसुखाची मागणी आणि..

Gopal Datkar Accused of Extortion and Atrocity: गोपाल दातकर यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि खंडणीचा गुन्हा दाखल; आमदार नितीन देशमुखांचा अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

Bhagyashree Kamble

शिवसेना ठाकरे गटाचे अकोला जिल्हाप्रमुख गोपाळ दातकर यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र इंगळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी इंगळेंवर गंभीर आरोप केले आहेत. "भाजपने विरोधकांना संपवण्यासाठी रचलेलं हे षडयंत्र आहे", असं आमदार देशमुख म्हणालेत.

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळेंवर गंभीर आरोप केले आहेत. इंगळे यांनी आपल्या कार्यालयातील महिलांकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आमदार देशमुखांनी आज जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेत दातकरांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी अन्याय केल्याची भावना मांडली आहे. तर भाजपने विरोधकांना संपवण्यासाठी रचलेलं हे षडयंत्र असल्याचा आरोपही देशमुखांनी केला आहे.

गोपाळ दातकरांवर ॲट्रोसिटी अन् खंडणीचा गुन्हा दाखल

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून अकोट तालुक्यातील "जल जीवन मिशन" योजनेंतर्गत अकोट ८४ खेडी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी शासनाने ५८ कोटी मंजूर केले असून, कामाला सुरूवात झाली आहे. तर काही ठिकाणी त्याचं काम सुरू होणे बाकी आहे. गोपाळ दातकर यांच्या सर्कलमध्ये अंदाजे ५० लाखांची कामे सध्या सुरूयेत.

त्यातून ५ लाख देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी दातकर यांनी इंगळेंना केल्याचा आरोप करण्यात आला होता. इंगळे यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावर गोपाल दातकर यांनी धमकी देत जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप राजेंद्र इंगळे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. त्यावरून अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये गोपाळ दातकरांवर ॲट्रॉसिटी तसेच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

Shocking: बायकोचं शिर धडावेगळं केलं, नंतर शरिराचे १७ तुकडे करत...; आयुष्यभर साथ देण्याचं वचन देणाऱ्या नवऱ्याचा क्रूर चेहरा समोर

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT