Akola Crime News Saam tv
महाराष्ट्र

Akola Crime : धक्कादायक! अकोल्यात एमडी ड्रग्स तस्करी; आरोपीचं वंचित बहुजन आघाडीचं कनेक्शन उघड

Akola Crime News : अकोल्यात एमडी ड्रग्स तस्करी समोर आली आहे. या आरोपीचं वंचित बहुजन आघाडीचं कनेक्शन उघड झालं आहे.

Saam Tv

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोल्यात एमडी ड्रग्स तस्करीचा प्रकार समोर आलाय.. एमडी ड्रग्स प्रकरणात अकोल्यातल्या खदान पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मोहम्मद यासीन मोहम्मद आसिफ मोहम्मद यासीन मोहम्मद आसिफ आणि मुस्ताक खान हादीक मुस्ताक खान असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. त्यांच्याकडून 2 लाख 30 हजार रुपयांचं एमडी ड्रग्स ताब्यात घेण्यात आले. या एमडी ड्रग्सचं वजन 46 ग्रॅम 30 मिली ग्रॅम इतकं आहे. दरम्यान, अकोल्यातल्या गौरक्षण रस्त्यावरील परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. या दोघांनी एमडी ड्रग्स अकोल्यात विक्रीसाठी आणलं असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. यातील मोहम्मद यासीन हा आरोपी 'बीएएमएस'च्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहेय. तर फरार आरोपी गब्बर जमादार हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आणि पोलीस मित्र आहेय. या घटनेने संपूर्ण अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

अकोल्यातल्या खदान पोलीस स्टेशन हद्दीतील आदर्श कॉलनीत दोन व्यक्ती दुचाकीवर अंमली पदार्थ विक्रीसाठी आणले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर या ठिकाणी पाहणी केली असता हे दोघे जण मोटर सायकलवर संशयितरित्या उभे असलेले दिसले. त्यांना तेथे थांबण्याचं कारण विचारले असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यांची अंगडझती घेतली असता त्यांच्याकडे एमडी ड्रग्स आढळून आलं.

ज्याचं वजन 46 ग्रॅम 30 मिली ग्रॅम इतकं होत. मोहम्मद यासीन मोहम्मद आसिफ (वय 23, रा. पंचगव्हाण ता. तेल्हारा जि. अकोला असून तो सद्यस्थितीत फिरदोस कॉलनी गवळी पुरा, येथील रहिवासी.) तर मुस्ताक खान हादीक खान (वय 47, रा. गफुरवाला प्लॉट अकोला जि. अकोला या दोघांना पुढं ताब्यात घेण्यात आले. 2 लाख 30 रुपयांचं एमडी ड्रग्स त्यांच्याकडून जप्त करण्यात आलं. तर दोन मोटर सायकली देखील ताब्यात घेतल्या आहे.

दरम्यान, मोहम्मद यासीन मोहम्मद आसिफ आणि मुस्ताक खान हादीक खान, अन्य फरार असलेला गब्बर जमादार यांच्याविरूद्ध खदान, पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आली आहे. अकोल्याचे पोलीस अधिक्षक आर्चित चांडक, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सतिश कुलकर्णी यांच्या मार्गदशनाखाली पोलीस पोलीस निरीक्षक मनोज केदारे, योगेद्र मोरे पोलीस अंमलदार एएसआय दिनकर धुर, संजय वानखडे, रवि काटकर, विजय मुलनकर आदींनी ही कारवाई केली आहे.

एमडी ड्रग्स प्रकरणातील 'त्या' आरोपी संदर्भात वंचितची प्रतिक्रिया

'फरार आरोपी गब्बर जमादार याचा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता नाही. सद्यस्थितीत त्याचा पक्षासोबत कुठलाही संबंध नाही. गब्बर जमादार याचे नातेवाईक वंचित बहुजन आघाडीमध्ये होते. मात्र त्यांनीही आता दुसरी वाट पकडली. त्यामुळे आरोपी गब्बर आणि त्याच्या कुटुंबीयांचा वंचित पक्षाचे कुठलाही संबंध नाही, असं वंचितचे माजी नगरसेवक गौतम गवई यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात भाजपची पॉवर, मनसे नेत्यासह ४ बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ

Drunk Police Constable: मद्यधुंद पोलिसाची 6 गाड्यांना धडक, पोलिसांवर प्रकरण दडपण्याचा आरोप|VIDEO

Shahapur : दारूच्या नशेत विहीरीत उडी; एका व्यक्तीचा मृत्यू, पोलीस येताच गावकरी आक्रमक

Maharashtra Live News Update: सोलापुरात पत्नीचा पतीकडून खून; परिसरात खळबळ

Bonus Called In Marathi: दिवाळीला मिळणाऱ्या बोनसला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहितच नाही?

SCROLL FOR NEXT