Akola, mla nitin deshmukh, devendra fadnavis, water saam tv
महाराष्ट्र

Akola News : देवेंद्र फडणवीसांचा दाैरा अन् ठाकरेंच्या आमदारासह 125 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; अकाेल्यात नेमकं काय घडलं

अकाेला जिल्ह्यातील अवैध व्यवसाय तातडीने बंद करावे अशी मागणी आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे.

जयेश गावंडे

MLA Nitin Deshmukh News : सत्ता येते सत्ता जाते. अधिका-यांनी नियमाने काम करावे, काेणाच्याही दबावाखाली कामकाज करु नये. केवळ शिवसैनिकांना टार्गेट करणार असाल तर शिवसैनिक गप्प बसणार नाहीत असा इशारा उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पाेलिस आणि जिल्हा प्रशासानस दिला. (Maharashtra News)

जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून‎ संघर्ष यात्रेसाठी गर्दी जमवल्या प्रकरणी आमदार नितीन‎ देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शहर प्रमुख‎ राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, दिलीप बोचे व योगेश गीते‎ यांच्यासह १२५ कार्यकर्त्यांवर जुने शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.‎ त्यापार्श्वभूमीवर आमदार देमशुख बाेलत हाेते.

आमदार नितीन‎ देशमुख यांनी श्री राज राजेश्वर मंदिरासमोर जिल्ह्यातील ६९‎ खेडी पाणीपुरवठा योजनेचे पाणी आरक्षण तसेच‎ महानगरपालिका अंतर्गत पाणी आरक्षणावरची स्थगिती‎ उठवण्याकरता पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‎ यांना खारपानपट्ट्यातील नागरिक जे पाणी पितात तेच पाणी ते‎ पाजण्यासाठी व आंघोळ घालण्यासाठी टँकरद्वारे नेऊन‎ पिण्याच्या पाण्याची संघर्ष यात्रा काढली.

आमदार नितीन देशमुख व त्यांचे १००‎ ते १२५ कार्यकर्ते परवानगी न घेता खारे पाणी संघर्ष यात्रेसाठी‎ सहभागी झाले होते. त्यापार्श्वभुमीवर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आमदार देशमुखांसह कार्यकर्त्यांवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kriti Sanon: क्रिती सेनॉनने खरेदी केला ७८ कोटींचा आलिशान पेंटहाऊस; जाणून घ्या किती आहे अभिनेत्रीची प्रॉपर्टी ?

Independence Day 2025: स्वातंत्रदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'भगवा लूक'; नेटकऱ्याचं वेधलं लक्ष

Raj Thackeray: मुंबईतील मतदार याद्या मनसे तपासणार; व्होटचोरी रोखण्यासाठी राज ठाकरेंचा प्लॅन काय?

FASTag Annual Pass: आजपासून सुरु होणार ३००० रुपयांचा फास्टॅग पास; कुठे मिळणार? वाचा ऑनलाइन प्रोसेस

Diabetes in India: देशात वाढतोय मधुमेहाचा धोका; 10 पैकी 4 जण अनभिज्ञपणे जगतायत या आजारासोबत

SCROLL FOR NEXT