Heat Wave Saam tv
महाराष्ट्र

Heat Wave : पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेची लाट; राज्यातील तापमानात वाढ, अकोल्यात ढगाळ वातावरण

Akola News : राज्यात मागील तीन- चार दिवसांपासुन उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. राज्यातील धुळे, नाशिक, जळगाव, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर, नागपूर या प्रमुख शहरांमधील तापमान ४० अंशाच्या वर पोहचले आहे

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: राज्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. जवळपास सर्वच शहरातील तापमानाचा पारा ४० अंशाच्या वर पोहचला आहे. यातच नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने आज दिलेल्या संदेशानुसार ८ व ९ एप्रिल दरम्यान विदर्भातील जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहण्याची शक्यता वर्तविली आहे. या अनुषंगाने दक्षता घेण्याबाबत जिल्हा प्रशासनाव्दारे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात मागील तीन- चार दिवसांपासुन उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. राज्यातील धुळे, नाशिक, जळगाव, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर, नागपूर या प्रमुख शहरांमधील तापमान ४० अंशाच्या वर पोहचले आहे. तर सलग दोन दिवस अकोल्याच्या तापमानात मोठी वाढ झाली होती. काल आणि परवा अकोला शहर राज्यात सर्वाधिक उष्ण शहर होते. अर्थातच राज्यातील सर्वाधिक तापमान अकोल्यात ४४.२ अंश सेल्सियस इतकं तापमान होतं.

अकोल्यात आज ढगाळ वातावरण 
दरम्यान, अकोला शहरात आज सायंकाळी ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. अकोला शहरात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, आज सायंकाळी चार वाजेनंतर अकोला शहरावर ढगाळ वातावरण पसरले आहे. अकोला शहरातल्या दुर्गा चौक, अकोट फेल, टिळक रोड, मोठी उमरी टॉवर चौक याचा आदी शहरातील भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे.

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी हे करा 
- तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे. 

- हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत. 

- बाहेर जातांना गॉगल्स, छत्री टोपीचा वापर करावा. 

- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, कैरीपाणी, लिंबूपाणी, ताक इत्यांदीचा नियमित वापर करण्यात यावा. 

- पशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे. 

काय करु नये?
- लहान मुले व पाळीव प्राण्यांना गेट बंद असलेल्या वाहनात तसेच पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये. 

- दुपारी १२ ते ३ या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. 

- गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. 

- जास्त शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. 

- उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नये.  

- मद्य सेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक घेवू नये, त्यामुळे डीहायड्रेशन होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बनावट रक्त चाचणीचे अहवाल देऊन विमा कंपनीची फसवणूक

Pune Crime: पुणे स्टेशनवर जबरी चोरीचा थरार! पैसे न दिल्याने पोटात भोसकला चाकू

PM मोदींसह आईचा AI व्हिडिओ पोस्ट केला, आता पोलिसांची मोठी कारवाई; काँग्रेससह आयटी सेलवर गुन्हा

India Vs Pakistan: भारत-पाकिस्तान सामना रद्द होऊ शकतो का? BCCI ला अधिकार आहे का, काय आहे नियम? जाणून घ्या!

Sharad Pawar : वाटेल ती किंमत मोजू, पण...; सामाजिक ऐक्यावर शरद पवारांचं नाशकात महत्वाचं विधान

SCROLL FOR NEXT