Akola News Saam tv
महाराष्ट्र

Court Judge : हायकोर्टाचा रेल्वेला दणका; खड्ड्यात पडून दोन बालकांचा बळी, रेल्वे प्रशासनाला धरले जबाबदार

Akola News : अकोट रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे प्रशासनाने पावसाचे पाणी साचण्यासाठी रेल्वेने हे खड्डे खोदलेले होते. या खड्ड्यांमध्ये पडून हितेश जेसवानी (वय १३) आणि विराज देशमुख (वय १२) या दोन मुलांचा पडून मृत्यू

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 
अकोला
: अकोला जिल्ह्यातील अकोट येथील रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच रेल्वेच्या जागेवरील पाणी साठलेल्या खड्ड्यात पडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वे प्रशासनाला प्रत्येकी ८ लाख रुपये अशी एकत्रित १६ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

अकोला जिल्ह्यातील अकोट रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे प्रशासनाने काही कामासाठी खड्डे खोदलेले आहेत. पावसाचे पाणी साचण्यासाठी रेल्वेने हे खड्डे खोदलेले होते. या खड्ड्यांमध्ये पडून हितेश जेसवानी (वय १३) आणि विराज देशमुख (वय १२) या दोन मुलांचा पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. घटनेनंतर दोन्ही मुलांच्या परिवारावर मोठा आघात झाला होता. याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला होता. 

खड्ड्याभोवती नव्हती कोणतीही सुरक्षा 

दोन्ही मुले अकोट रेल्वे स्टेशनच्या बाजूने असलेल्या रस्त्याने जात असताना उघड्या खड्ड्यात त्यांनी सहजच डोकावून पाहिले असता पाय घसरून त्या खड्ड्यात पडले. यात त्यांचा मृत्यू झाला होता. हा खड्डा पावसाचे पाणी साठवण्यासाठी रेल्वेने खोदलेला होता. मात्र तो पूर्णपणे उघडाच होता. त्याभोवती ना कुंपण होते, ना कोणतेही इशारे देणारे फलक लावण्यात आले होते. त्याठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था देखील करण्यात आलेली नव्हती.

नागपूर खंडपीठाचा निर्णय 

दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर मृत बालकाचे पालक सुनील जेसवानी यांनी नागपूर खंडपीठ याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी सुरू झाली. सुनावणीनंतर हायकोर्टाने रेल्वे विभागाला दणका दिला असून दोन्ही मुलांच्या मृत्यूस रेल्वे प्रशासनास जबाबदार धरण्यात आले असून मृत मुलांचा कुटुंबाला प्रत्येकी ८ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab: एकदम झक्कास! ‘हास्यजत्रा’ फेम शिवालीचे हटके फोटोशूट पाहिलंत का?

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा दणका; हा माजी आमदार भाजपच्या वाटेवर? VIDEO

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

Badam Shake : फक्त ५ मिनिटांत बनवा बदाम शेक, वाचा रेसिपी

Maharashtra Politics : ठाकरेंसोबत आमदार-खासदार फक्त नावाला, लवकरच भाजपात दिसतील, संकटमोचकाच्या वक्तव्यने राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT