Electric Shock Saam tv
महाराष्ट्र

Akola News : घरात खेळताना कूलरचा शॉक; मामाच्या घरी आलेल्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू

Akola News : घरात खेळत असताना त्यांचा कुलरला हात लागल्यानं जोरदार शॉक लागला अन् यात दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : घरात कुलर चालू असताना खेळात असताना कुलरला हात लागला. यावेळी कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने विजेचा जोरदार झटका बसून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. सदरची घटना अकोला जिल्ह्यातल्या अकोट शहरातल्या काळेगाव गावात ही घटना घडली आहे.

अकोला (Akola) जिल्ह्यात हि दुर्दैवी घटना घडली असून या घटने ईशानी प्रवीण ढोले (वय ४) आणि प्रियांशी सोपान मेतकर (वय ५) या चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. अकोट शहरातल्या काळेगाव गावात वास्तव्यास असलेल्या मामाकडे दोन्ही मुली आल्या होत्या. दरम्यान घरात खेळत असताना त्यांचा कुलरला हात लागल्यानं जोरदार (Electric Shock) शॉक लागला अन् यात दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंब हादरले आहे. 

दीड महिन्यात ५ जणांचा मृत्यू  

दरम्यान अकोल्यात मागील दीड महिन्यात आतापर्यत कुलरचा शॉक लागून ५ लोकांचा मृत्यु झाला आहे. आज अकोला जिल्ह्यात पुन्हा दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात येत आहे. या घननेने हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विधानपरिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर

Train Accident : कर्जतजवळ मालगाडी रुळावरून घसरली; मुंबई- पुणे रेल्वे मार्ग ठप्प, नेमकं काय घडलं?

धक्कादायक! सापासोबत स्टंटबाजी करनं महागात पडलं; ३० वर्षीय तरुणाचा कोब्राच्या दंशाने मृत्यू|VIDEO

Ashram School : आदिवासी आश्रम शाळेतील १३ विद्यार्थीना विषबाधा; पाच विद्यार्थीनी गंभीर, रुग्णालयात उपचार सुरु

Railway OHE Poles : रेल्वे ट्रॅकजवळील पोलवर असलेल्या या आकड्यांचा अर्थ काय? जाणून घ्या नेमकी माहिती

SCROLL FOR NEXT