Akola Crime Saam tv
महाराष्ट्र

Akola Crime : शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनची चोरी; चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

Akola News : अकोला जिल्ह्यात शेतात कापणी करून ठेवलेल्या सोयाबीन मालाची चोरी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु होता.

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : शेतात कापणी करून ठेवलेल्या सोयबीन शेतमालाची चोरी करण्यात आली होती. शेतातून माल चोरी करणाऱ्या टोळीच्या अकोला पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. अकोला पोलिसांच्या स्थानीक गुन्हे शाखेने शेतकऱ्यांचं सोयाबीन चोरणाऱ्या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

अकोला जिल्ह्यात शेतात कापणी करून ठेवलेल्या सोयाबीन मालाची चोरी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु होता. या प्रकरणात सोयाबीनची चोरी करणारी टोळी असल्याचे पोलिसांना समजताच या टोळीतीळ दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या दोघांकडून ५ चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून त्यांच्याकडून रेल्वे विभागाचे ३ टन कॉपर केबल जप्त करण्यात आले. यासह चोरी गेलेलं सोयाबीन देखील ताब्यात घेतले. 

२३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

दरम्यान अकोला जिल्ह्यातील बाळापूर, पातुर, जुने शहर आणि बार्शिटाकळी हद्दीतील शेतकऱ्यांचे सोयाबीन तसेच अकोट ग्रामीण हद्दीतुन पाणीपुरवठा विभागाच्या गोडावुन मधील साहित्य चोरल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी शेख निसार शेख इद्रिस आणि फारूक खान आसिफ खान या दोघांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून चोरी केलेल्या प्रकरणातील एकत्रित २३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धुळ्यात घरफोडी करणारे दोघे ताब्यात 
धुळे
: धुळे शहरातील प्रभात नगर परिसरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घरफोडीच्या प्रकरणात देवपूर पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना ताब्यात घेतळे आहे. त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपये किमतीचा चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. राम निकम यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्या- चांदीचे दागिने आणि पितळी भांडी चोरून पोबारा केला होता. या प्रकरणी देवपुर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दोन संशयित तरुणांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली असता सदर चोरी त्यांनीच केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा सोनं किती रुपयांना? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं गुजराती भाषेमधून भाषण; सोशल मीडियावर तुफान चर्चा|Video Viral

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Maharashtra News Live Update: पुणे विद्यापीठ कुलसचिवांच्या कार्यालयाच्या बाहेर अभाविप आक्रमक

SCROLL FOR NEXT