Akola shocking medical case: Pipe found stuck inside youth’s rectum after X-ray. saam tv
महाराष्ट्र

Shocking: भयंकर! तरुणाच्या गुद्दद्वारात अडकला पाईपचा तुकडा; एक्स-रे काढल्यानंतर डॉक्टरही चक्रावले

Akola shocking pipe Found In young man Rectum : अकोल्यातील एक धक्कादायक घटना घडलीय.एका तरुणाला गुदाशयात पाईप अडकल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी एक्स-रे काढल्यानंतर या वृत्ताची पुष्टी केलीय. पाईप काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची तयारी करण्यात आलीय.

Bharat Jadhav

  • अकोला जिल्ह्यात धक्कादायक वैद्यकीय घटना घडली.

  • तरुणाच्या गुद्दद्वारात पाईप अडकला असल्याचं आढळलं.

  • एक्स-रेमध्ये पाईपचा मोठा भाग आत असल्याचं स्पष्ट झालं.

  • शस्त्रक्रियेद्वारे पाईप बाहेर काढण्यासाठी तयारी सुरू आहे.

अक्षय गवळी, साम प्रतिनिधी

अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका तरुणाच्या गुद्दद्वारात पाईप अडकला आहे. अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात तरुणाला उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. थोड्यावेळातच तरुणावर शस्त्रक्रिया करून अडकलेला पाईपचा तुकडा बाहेर काढण्यात येणार आहे. दरम्यान, तरुणाचा एक्स-रे केल्यानंतर जास्त प्रमाणात पाईप आतमध्ये असल्याचे समजते आहे. दरम्यान, हा प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 30 वर्षीय तरुणाच्या गुद्दद्वारात हा पाईप अडकून आहे. साधारणतः दोन ते अडीच फुटाचा हा प्लास्टिकचा पाईप आहे. त्यातील काही भाग हा तरुणाच्या गुद्दद्वारात अडकून आहे. तरुणांच्या नातेवाईकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार घरात पलंगावरून खाली पडल्यानंतर हा पाईप तरुणाच्या गुद्दद्वारात अडकला होता. यामध्ये गुद्दद्वाराच्या ठिकाणी मोठी दुखापत झालेली आहे. तातडीने नातेवाईकांनी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केले आहे.

अकोल्याचे शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता मीनाक्षी गजबे यांनी दिलेला माहितीनुसार आज रात्री साडेनऊ वाजता त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतरच पुढील बाब स्पष्ट होणार आहे. सद्यस्थितीत तरुणाची प्रकृती स्थिर असून त्याच्या गुद्दद्वाराच्या ठिकाणी मोठी जखम झाली आहे. 8 ते 9 इंच हा पाईप त्याच्या गुद्दद्वारात अडकलेला आहे. या संपूर्ण घटनेनंतर स्थानिक डॉक्टर चिंतेत पडलेत.

दरम्यान, अद्यापपर्यंत तरुणाने डॉक्टरांसमोर सर्व खुलासे केलेले नाही आहे, हा पाईप गुद्दद्वाराच्या आत अडकून कसा बसला, याचं देखील खरं कारण समोर आलं नाही. या अडकलेल्या पाईपमूळ त्याला शौचास जाण देखील कठीण झाले आहे. अखेरीस याच खर कारण समजल्यावर डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास मदत होईल, अन पाईप बाहेर काढायला मदत होईल, असेही काही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून समजते आहे. सध्या या व्यक्तीची प्रकृती व्यवस्थित आ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा एकच इशारा; नंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार-खासदारांनी लावली रांग

Maratha reservation: मनोज जरांगेंना अवघ्या 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी, काय आहेत न्यायालयाच्या अटी

Tariff War: पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन मोडवर! ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात आखला 'स्पेशल ४०'चा प्लॅन

Raj And Uddhav Thackeray Meets: तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, ठाकरे बंधूंच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

Maharashtra Live News Update: पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर कारने घेतला पेट

SCROLL FOR NEXT