Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News: लोकप्रतिनिधी हरविले, शोधणाऱ्यास ५१ हजाराचे बक्षिस; अकोल्‍यात अभिनव आंदोलन

लोकप्रतिनिधी हरविले, शोधणाऱ्यास ५१ हजाराचे बक्षिस; अकोल्‍यात अभिनव आंदोलन

जयेश गावंडे

अकोला : गेल्या सहा महिन्यांपासून गांधीग्राम- अकोट (Akot) मार्ग बंद असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास (Akola News) सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत आज त्यांच्या निषेधार्थ वंचित युवा आघाडीने हरविलेले जनप्रतिनिधी शोधण्यासाठी महादेवाला साकडे घातले. (Maharashtra News)

अकोला– अकोट मार्ग हा गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. यामुळे अकोला अकोट रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. यामुळे सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. मात्र सहा महिने उलटून देखील त्यावर काहीही उपाययोजना करण्यास लोक प्रतिनिधींना अपयश आले आहे. उलट तात्पुरत्या पुलाचे बांधकाम करून वाहतूक सुरू करण्याचा दिखाऊपणा आणि त्याचेही श्रेय घेण्यासाठी उद्घाटन करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी वंचित बहुजन यूवआ आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी करीत संतप्त भावना व्यक्त केल्या.

५१ हजार रूपयांचे बक्षिसाची घोषणा

जिल्ह्याचे खासदार संजय धोत्रे, अकोला पुर्वचे आमदार रणधीर सावरकर व अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना शोधून आणणाऱ्यास ५१ रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करीत अभिनव पद्धतीने आंदोलन केले. या आंदोलनादरम्‍यान वंचित बहुजन युवा आघाडीने महादेवाला साकडे देखील घातले. प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे आणि जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर यांनी केले. आंदोलनात जिल्हा संघटक समीर पठाण, दादाराव पवार रंजीत तायडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : जमिनीच्या वादातून KDMC कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; कुख्यात गुंडाचा हात असल्याचा संशय, एकाला अटक

Usain Bolt : जगातील वेगवान धावपटू उसेन बोल्टला आता एक पाऊलही टाकणं जड जातंय,ऑलिम्पियन दिग्गज म्हणाला...

Crime: पोलिस भरतीच्या फीसाठी पैसे दिले नाही, संतापलेल्या तरुणाने बापाला जागीच संपवलं; लातूर हादरले

GK: भारतातील 'असं' एकमेव राज्य जिथे आजपर्यंत रेल्वे सेवा पोहोचलेली नाही, जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बापाची मुलाने केली हत्या, पोलीस भरतीसाठी पैसे न दिल्याने घेतला जीव

SCROLL FOR NEXT