Manasvi Choudhary
लग्नात नवरीसाठी डिझाईन्सचे ब्लाऊज पॅटर्न शिवायचे असतील तर तुम्ही हे पॅटर्न नक्की ट्राय करा.
कोर्सेट स्टाईल ब्लाऊज डिझाईन हे सध्या ट्रेंडमध्ये आहे. अत्यंत स्टायलिश पॅटर्नमध्ये हा ब्लाऊज शिवला जातो. लेहेंग्यावर हे डिझाईन उठून दिसते.
ब्लाऊजच्या पाठीवर गोल किंवा चौकोनी आकाराऐवजी 'लाटांसारखे वर्क केले जाते. यामध्ये तुम्ही मोती जरदोसीचे लटकन लावल्यास लूक उठून दिसतो.
ब्लाऊजच्या पाठीवर नवरी-नवरदेवाचे नाव, लग्नाची तारीख किंवा डोलीचे चित्र कस्टमाइज्ड करून घेतले जाते.
जुन्या काळातील फुग्याच्या बाह्यांची डिझाईन सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. कोपरापर्यंत बाह्या आणि त्यावर साडीचा मोठा काठ हे पैठणी साडीवर अतिशय सुंदर दिसते.
ज्यांना मॉडर्न आणि बोल्ड लूक हवा आहे, त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. समोरून खोल 'V' आकार आणि त्यावर डायमंड वर्क केलेले डिझाईन असते.
ब्लाऊजच्या पाठीवर दागिन्यांसारख्या सोन्याच्या चेन किंवा मोत्याच्या माळा जोडलेल्या असतात. हे डिझाइन प्रामुख्याने रिसेप्शनच्या साड्यांवर किंवा लेहेंग्यावर उठून दिसते.
केवळ बाह्यांच्या मध्यभागी वेलीचे किंवा कमळाचे नक्षीकाम सध्याचे मिनिमलिस्टिक ट्रेडिंग डिझाइन आहे.
बाह्यांच्या कडांवर कापड कापून तिथे जाळीदार नक्षी केली जाते. हे डिझाइन सिल्क साड्यांवर खूप मोहक दिसते.
खोल पाठ आणि त्याला जोडणारे मोठे, हाताने बनवलेले गोंडे हे डिझाइन लग्नाच्या संगीत किंवा मेहंदी समारंभासाठी परफेक्ट आहे.