Akola News Murtijapur police action on cafe love couple caught up Saam TV
महाराष्ट्र

Police Action: गजबजलेल्या कॅफेवर अचानक पोलीस धडकले; प्रेमीयुगुलं रंगेहाथ पकडली, अनेकांची पळापळ

Murtijapur Police Action: अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर येथील एका गजबजलेल्या कॅफेवर पोलिसांनी बुधवारी अचानक धाड टाकली. यावेळी अनेक प्रेमीयुगुलं नको ते चाळे करताना दिसली.

Satish Daud

Murtizapur Police Lover Couple Action

अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर येथील एका गजबजलेल्या कॅफेवर पोलिसांनी बुधवारी अचानक धाड टाकली. यावेळी अनेक प्रेमीयुगुलं नको ते चाळे करताना दिसली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत कॅफेच्या मालकासह ४ तरुण आणि २ तरुणींना ताब्यात घेतलं. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कलमाअन्वये कारवाई करण्यात आली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या कारवाईमुळे परिसरातील प्रेमीयुगुलांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून अनेकांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केलं आहे. मूर्तीजापूर तालुक्यातील नामवंत अश्या तिडके नगर परिसरात एका कॅफेत प्रेमीयुगुलांचा वावर वाढला होता. कॅफेच्या नावाखाली या ठिकाणी अश्लिल चाळे करण्याचे प्रकार वाढत होते.

मूर्तिजापूर शहरातच नव्हे तर अख्ख्या अकोला जिल्ह्यामध्ये कॅफेच्या नावाखाली युवक युवतींचे अश्लील चाळे करण्याचा प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. यासंदर्भात पोलिसांना अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. बुधवारी मूर्तीजापूर पोलिसांनी अचानक या कॅफेवर छापा मारला.

यावेळी पोलिसांना अनेक तरुण तरुणी अश्लिल चाळे करताना आढळून आले. पोलीस आल्याचे पाहून काहींनी धूम ठोकली. पोलिसांनी काहींना पकडले, तर काहीजण पसार झाले. दरम्यान, पोलिसांनी कॅफे चालकासह ४ तरुण आणि २ तरुणींना ताब्यात घेत चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेलं.

या प्रेमीयुगुलांची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अचानक सुरू केलेल्या धाडसत्रामुळे प्रेमीयुगुलांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अनेक दिवसांच्या तक्रारींचं निवारण झाल्याने परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचं स्वागत केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

Vastu Tips For Luck: चांगले दिवस येण्यापूर्वी दिसतात 'हे' शुभ संकेत

Garlic Benefits : लसूण खाण्याची योग्य पद्धत आणि जबरदस्त फायदे

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

SCROLL FOR NEXT