Akot News Saam tv
महाराष्ट्र

Akot News : साधूच्या वेशात बिबट्याची शिकार करून कातडीची तस्करी; अकोटमधून तीनजण ताब्यात

Akola News : अकोल्यात साधूच्या वेशात बिबट्याच्या कातडीची विक्री होत असल्याची माहिती पुणे येथील कस्टम युनिटला मिळाली त्या आधारावर अकोला परिक्षेत्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वनक्षेत्रात पाळत ठेवली

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : चक्क साधूच्या वेशात बिबट्याची शिकार करून बिबट कातडीची तस्करी केला जात असल्याचा प्रकार अकोल्यात समोर आला आहे. पुणे कस्टम युनिटने बिबट कातडी विक्रीचा प्रकार उघडकीस आणला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बिबट्याची कातडी विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या या तिघांना अकोल्यातल्या अकोटमधून अटक करण्यात आली आहे. 

अकोल्यात साधूच्या वेशात बिबट्याच्या कातडीची विक्री होत असल्याची माहिती पुणे येथील कस्टम युनिटला मिळाली होती. त्या आधारावर अकोला परिक्षेत्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अकोटच्या वनक्षेत्रात पाळत ठेवली आणि गुन्हेगारांना पकडले. या प्रकरणात अकोट येथील तीन जणांना अटक झाली. आशिष सिकची, नंदकिशोर सिकची आणि राजकुमार सिकची असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. 

साधूच्या वेशातील दोघे फरार 

दरम्यान, यातील एक आरोपी हा बाहेरील राज्यातील असून त्यांना सात दिवसाची वन कोठडीची मागणी वन विभाग न्यायालयाकडे करणार आहेत. त्यांच्याकडून एका बिबटची कातडी शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. तर हॉटेलमध्ये टाकलेल्या दुसऱ्या छाप्याच्यावेळी याच प्रकरणाशी संबंधीत दोन महाराजांनी (साधूच्या वेशात असलेल्या) पलायन केले. त्यांचा शोध घेत असल्याचे अकोल्याचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी सचिन खुणे यांनी सांगितले.

वन विभागाकडून पुढील तपास सुरु 

आतापर्यंत बिबट्याची शिकार करून कातडी विक्री करणाऱ्या तिघांना गजाआड करण्यात आले आहे.. अटकेमध्ये दोन वाहक आणि एक मध्यस्थाचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत त्यांनी किती बिबटची शिकार करून कातडी विकली आहे. आणि या टोळीत किती जणांचा सहभाग आहे, या दिशेनेही तपास केला जाणार असल्याचे ते म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा दणका; हा माजी आमदार भाजपच्या वाटेवर? VIDEO

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

Badam Shake : फक्त ५ मिनिटांत बनवा बदाम शेक, वाचा रेसिपी

Maharashtra Politics : ठाकरेंसोबत आमदार-खासदार फक्त नावाला, लवकरच भाजपात दिसतील, संकटमोचकाच्या वक्तव्यने राजकीय भूकंपाचे संकेत

TMC पक्ष कार्यालयात नेलं अन् विवस्त्र करून व्हिडिओ..भाजप महिला नेत्याचा गंभीर आरोप; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT