Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News : अकोल्यात अवैध दारूसाठा जप्त; ९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Akola News : राज्यात विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. सकाळपासून मतदानाला सुरवात झाल्यानंतर आज मतदानाच्या दिवशी अवैध दारूचा मोठा साठा अकोला जिल्ह्यात जप्त करण्यात आला

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. तर दुसरीकडे अवैधपणे दारू विक्री सुरु असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारू साठा जप्त केला आहे. तर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.  

राज्यात विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. सकाळपासून मतदानाला सुरवात झाल्यानंतर आज मतदानाच्या दिवशी अवैध दारूचा मोठा साठा (Akola News) अकोला जिल्ह्यात जप्त करण्यात आला. अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकत कारवाई केली आहे. पोलिसांनी धाड टाकल्यानंतर तेथे दारूचा साठा मोठ्या प्रमाणात आढळून आला.  

पोलिसांनी केलेल्या कारवाईत दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांसह एक वाहन ताब्यात घेतले आहे. दरम्यान अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पातूर शहरात ही कारवाई केली असून ७७ हजाराची दारु साठ्यासह एकत्रित नऊ लाखांवर मुद्देमाल जप्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : राजेश लाटकर आणि क्षीरसागर समर्थक भिडले, कोल्हापुरात राडा

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार? एक्झिट पोलचा अंदाज आला समोर, वाचा

Maharashtra Exit Poll : भाजप सर्वात मोठा पक्ष, पण महाविकास आघाडीकडे 'मॅजिक फिगर'

VIDEO : भंडाऱ्यात दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकमेकांना भिडले | Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान

SCROLL FOR NEXT