Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News : भाजपच्या गडात उच्चशिक्षित तरुण उतरणार निवडणुकीच्या मैदानात?; वंचितकडे मागितली उमेदवारी

Akola News : शेती करत असतानाच शेती, शेतकरी आणि तरुणाईच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याला राजकारणाच्या रणांगणात उतरवायचे आहे

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे पाहण्यास मिळत आहे. सुरवातीपासून राजकारणात उतरलेल्यांची पक्षश्रेष्टींकडे तिकिटासाठी मागणी केली जात आहे. मात्र, उमेदवारी, निवडणूक आणि राजकारण यापासून शिकलेली नवतरुणाई आजही दूरच राहण्याचा विचार करते. मात्र अकोला जिल्ह्यात एका उच्चशिक्षित तरुणाने विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. त्याने वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी मागितली असून या इच्छुक तरुणाच्या उमेदवारीच्या मागणीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

अकोला (Akola News) पूर्व मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडे एका उच्चशिक्षित अभियंता असलेल्या शेतकरी तरुणाने उमेदवारी मागितली आहे. कौस्तुभ देशमुख असं या तरुणाचं नाव आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विषयात 'एम.टेक' झालेला कौस्तुभ सध्या अकोला शहरालगतच्या डोंगरगावात आधुनिक शेती करतोय. मात्र, शेती करत असतानाच शेती, शेतकरी आणि तरुणाईच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याला राजकारणाच्या रणांगणात उतरवायचे आहे. यासाठी त्याने अकोला पूर्व मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवाराची मागणी केली आहे.

अकोला जिल्ह्यातील एकूण पाच विधानसभा मतदारसंघांपैकी बाळापुर आणि मुर्तीजापुर मतदार संघात वंचितने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर अकोला पूर्व मतदारसंघात कौस्तुभ देशमुख यांच्यासह पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर आणि जिल्हा परिषदेतील गटनेते ज्ञानेश्वर सुलताने उमेदवारीच्या शर्यतीत आहे. दरम्यान, अकोला पूर्व विधानसभा मतदार संघ ही जागा महायुतीत भाजपला सुटली आहे. येथे भाजपकडून विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांना पक्षाने उमेदवारी दिली. सावरकर हे सलग दोनदा निवडून आले आहेत. मात्र, मविआमध्ये अकोला पूर्व जागेवरून वाद आहे. 

इच्छुकांची मोठी लाईन 

काँग्रेस आणि ठाकरे गटाने या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर, माजी आमदार हरिदास भदे, माजी नगरसेवक देवश्री ठाकरे, माजी नगरवसेक मंगेश काळे आणि इतर काही जण इच्छुक आहे. मात्र, शरद पवार राष्ट्रवादीतून कोणीच नइच्छुक नसल्याचं चर्चा आहे. तर काँग्रेसमधून युवक काँग्रेस प्रदेश महासचिव कपिल ढोके, पुजा काळे, जगदिश मुरुमकार, राजेश मतेसह इतर इच्छुक आहेत. वंचितकडून तिकीट मिळवण्यासाठी नेत्यांची धावपळ आहे. जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर सुलताने, संतोष हुशे, पवन बुटे, बालमुकुंद भिरड, शंकरराव इंगळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनिल फाटकर, वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवधन पुंडकर हे देखील इच्छुकांच्या रांगेत आहेत. यात उच्चशिक्षित अभियंता असलेल्या कौस्तुभ देशमुख याची देखील भर पडली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडे उमेदवारी मागितली असून आंबेडकरांची भेट देखील घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT