Akola Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime: उच्चशिक्षित विवाहितेचा छळ; लग्‍नाच्‍या दुसऱ्या दिवसापासूनच सुरवात, पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा

उच्चशिक्षित विवाहितेचा छळ; लग्‍नाच्‍या दुसऱ्या दिवसापासूनच सुरवात, पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा

जयेश गावंडे

अकोला : घरची कामे येत नाही, माहेरहून पैसे घेऊन ये, असे म्हणून उच्चशिक्षित विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी पतीसह (Nagpur) नागपूर येथील नवीन सुभेदारसह पतसंस्थेचे संचालक तथा (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोहन ठाकरे व अन्य सहा जणांविरूद्ध खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

महिलेच्या तक्रारीनुसार (Akola) अकोल्यातील कपिलानगर गोरक्षण रोड येथील बी.टेक शिक्षण झालेल्या व नोकरीला असलेल्या युवतीचा (Marriage) विवाह नागपूर येथील खडगाव रोड लावा येथील मयुर मोहन ठाकरे याच्याशी झाला होता. लग्नामध्ये पती व सासु- सासरे यांच्या मागणीनुसार साडेसात लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम दिली होती. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आतेसासू सुरेखा काशीनाथ इंगळे हिने घरातील सर्व लोकांसमोर तू नाकाची नथ आणली नाही. तुझ्या बापाने तुला विकले असे म्हणून विवाहितेचा अपमान केला होता.

पतीकडून दारू पिवून पैशांचा तगादा

विवाहितेच्या पतीला दारूचे (Crime) व्यसन होते. त्यामुळे रोज दारू पिऊन घरी यायचा आणि या त्याच्या कारचे हप्ते भरण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावायचा. त्यानुसार विवाहितेच्या वडिलांनी त्याला 89 हजार रूपये ऑनलाइन पाठवले होते. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढल्याने ते आणखी पैशांची मागणी करीत होते. आणखी पैसे घेऊन ये. त्यासाठी नकार दिल्यानंतर शिवीगाळ करून मारहाण करायचे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती मयुर मोहन ठाकरे, सासरे मोहन दशरथ ठाकरे, सासू सुनिता मोहन ठाकरे, दीर मकरंद मोहन ठाकरे, रेखा उर्फ सुरेखा काशीनाथ इंगळे, गणेश काशीनाथ इंगळे, डॉ. हृदयनाथ मार्कड, रामदास थोटे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर खिळे कोणी ठोकले? MSRDC नं दिलं स्पष्टीकरण

Pitru Paksha 2025: पितृपक्षात पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी दिवा कोणत्या दिशेला लावावा?

Maharashtra Live News Update : मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी, उदगीरमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट

Chanakya Niti : पाठीत खंजीर खुपसणारा मित्र कसा ओळखाल? चाणक्यांनी सांगितलं भयानक गुपित

GST Reforms: कारचं स्वप्न होणार पूर्ण, ही मिनी कार तब्बल ३ लाखांनी स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत

SCROLL FOR NEXT