Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola : सोन्याचे विक्रमी दर; अकोल्यात मात्र कमी भावात सोनं, काय आहे नेमकं प्रकरण वाचा

Akola News : सोन्याचे दर वाढले असताना जीएसटी नसलेले सोने कमी दरात दरात देत असल्याचे सांगून लुबाडणूक केली जात आहे. इतकेच नाही तर पैसे घेत बनावट सोने दिले जात असल्याचा प्रकार अकोल्यात समोर आला

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : एकीकडं सोन्याची किमती मोठी झेप घेत आहे. रोज सोने- चांदीच्या दरात वाढ होत असल्याने सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. अशातच तुम्ही दिवाळीच्या मुहूर्तांवर सोने खरेदी करताय, तर ही बातमी नक्कीच पाहा. कारण, अकोल्यात कमी भावात सोनं उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. अर्थात कमी दरात सोनं मिळत असल्याच्या आमिषाला महिला बळी पडत आहे. 

आजच्या स्थितीला सुवर्ण बाजारात सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली असून सोने सव्वा लाख रुपयांच्या पार पोहचले आहे. अशा परिस्थितीत कमी दरात सोन्याचे दागिने देत असल्याचे आमिष दाखवत या महिलेकडून सव्वा कोटींच्या जवळपास रुपये घेत तिला नकली सोन देण्यात आल्याचे प्रकार अकोल्यात समोर आला आहे. सुरुवातीला असली सोनं दिलं, मात्र विश्वास संपादन झाल्यानंतर नकली सोनं देण्यात आले. 

तक्रार दाखल होताच चौघेजण ताब्यात 

या प्रकरणात एका महिलेची फसवणूक करण्यात आली. तब्बल १ कोटी ११ लाख १२ हजार रुपयांनी महिलेला गंडविले आहे. या प्रकरणी सदर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर रामदास पेठ पोलिसांनी तात्काळ चौघांना अटक केली. त्यांच्याकडून ५१४.७२० ग्रॅम वजनाचे सोन्याची दागिने जप्त करण्यात आले. ज्याची किंमत सुमारे ६१ लाख ७६ हजार रुपये इतकी आहे.

रक्कमेत असली सोने घेत ठेवले गहाण 

पोलिसांनी आरोपी अमोल नेरकर, मनोहर नेरकर, प्रेम गावंडे आणि नीतेश महल्ले यांनी महिलेकडून जीएसटी न लागलेले सोने कमी दरात मिळत आहे असं आमिष दाखवलं. त्यानंतर नकली सोन्याचे चांदीची विक्री करून सव्वा कोटी रुपयांनी फसवणूक केली. दरम्यान, महिलेकडून मिळालेल्या पैशातून असली सोने घेऊन ते अकोला, तेल्हारा, नांदुरा, खामगाव आणि बुलढाणा येथील ज्वेलर्सकडे या चौघांनी गहाण ठेवले होते. उर्वरित दागिने जप्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

SCROLL FOR NEXT