Akola News Saam tv
महाराष्ट्र

Local Train : गटारी अमावस्येचा उत्साह; बोकडचा लोकल ट्रेनमधून प्रवास, नेमकं कुठं घडलं?

Akola News : बोकडचा या रेल्वे प्रवासाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठा वायरल होत आहे. दरम्यान हा व्हिडिओ अकोला जिल्ह्यातील अकोला अकोट रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेमो ट्रेनमधील आहे

Rajesh Sonwane

अक्षय गवळी
अकोला
: आषाढ संपून श्रावण महिन्याला सुरवात होणार आहे. यासाठी एक दिवस बाकी राहिला असून राज्यभर गटारी अमावस्याचा उत्साह आहे. चिकन- मटण दुकानांबाहेर मांसाहारी प्रेमींच्या मोठ्या रांगा आहेत. गटारी अमावस्येच्या अनुषंगाने बकरी उत्पादक शेतकरी थेट आपलं बोकड मांस विक्रेत्याच्या दुकानावर विकायला घेऊन जातात. अशातच एका बोकड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. 

आषाढ अमावस्या अर्थात गटारी अमावस्या असल्याने नॉनव्हेज खाणाऱ्यांची मोठी गर्दी आता चिकन- मटण विक्रीच्या दुकानावर पाहण्यास मिळत आहे. यात मोठी उलाढाल होताना दिसून येत असून या व्यक्तीने थेट बोकड अकोला- अकोट धावणाऱ्या लोकल रेल्वेतून नेल्याचे पाहण्यास मिळत आहे. सध्या बोकडचा या रेल्वे प्रवासाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठा वायरल होत आहे. दरम्यान हा व्हिडिओ अकोला जिल्ह्यातील अकोला अकोट रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेमो ट्रेनमधील आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी लोकल 
अकोला- अकोट मीटर गेजचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करुन प्रवासी रेल्वेगाडी सुरु करण्यात आली. सामान्य नागरिकांसाठी रेल्वे प्रशासनाने नोव्हेंबर २०२२ मध्ये अकोट ते आकोला पॅसेंजर अर्थातच लोकल गाडीच्या फेऱ्या सुरू केल्या. या गाडीचे तिकीट केवळ ३० रुपये घेण्यात येत आहे. या रेल्वेला प्रवाशांचा मोठा वाढता प्रतिसाद आहे. दररोज रेल्वे हाऊसफुल्ल राहते. म्हणून इथं बसण्यासाठी जागा अपुरी पडतं. 

बोकड सोबत घेऊन प्रवास 

मात्र, या गाडीतून आता चक्क बोकड्याचा प्रवास सुरु झाला आहे. मात्र रेल्वे प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. नागरिक चक्क जनावरे घेत प्रवास करीत आहे. एकाने बोकड सोबत घेत रेल्वे डब्यात बसून प्रवास केल्याचा प्रकार समोर आला आहे. या रेल्वे बोकड घाण करीत ओरडत प्रवासाची मजा लुटत असलं, तरी रेल्वेमधून मनमानी प्रवास करण्यास कोणीच प्रतिबंध करीत नसल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: थंडीचा कडाका वाढला, मुंबई पुण्यासह महाराष्ट्र गाराठला

उत्खनन गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई; 4 तहसीलदारांसह दहा जण निलंबित, प्रशासनात खळबळ

मध्य रेल्वेचा जुना ब्रिज पाडताना घडली दुर्घटना; कामगाराचा मृत्यू

बीडमध्ये भयंकर अपघात; डिझेल टँकर जळून खाक; भयावह दुर्घटनेचा घटनाक्रम आला समोर

मुंबई जिंकण्यासाठी महायुतीची रणनीती, भाजप-शिंदेसेनेला मलिक नको, मुस्लीम हवे?

SCROLL FOR NEXT