Akola Farmer Saam tv
महाराष्ट्र

Akola Farmer : भयावह! थर्मोकोल सिट्स, बांबूपासून तयार केलेल्या नावेतून जीवघेणा प्रवास; १५ वर्षापासून शेतकऱ्यांची शेतीसाठी कसरत

Akola News : नदीच्या दुसऱ्या काठावर शेती असलेल्या शेतकऱ्यांचा शेतात जाण्यासाठी असलेला एकमेव रस्ता पूर्णपणे बंद परिणामी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी हा नदीतला जीवघेणा प्रवास करीत नदी पार करावी लागते

Rajesh Sonwane

अक्षय शिंदे 

भंडारा : शेतात जाण्यासाठी मार्ग नसल्याने नदीच्या पाण्यातून शेतकऱ्यांना प्रवास करावा लागत असतो. शेती करण्यासाठी हि कसरत भयावह असून शेतकऱ्यांनी नदीतुन जाण्यासाठी थर्मोकोल सीट्स व बांबूंपासून तयार केलेल्या नावेतून जावे लागत असते. नदीतला हा जीवघेणा प्रवास होतोये फक्त न फक्त शेतीत दरोरोज घाम गाळण्यासाठी. हे चित्र अकोला जिल्ह्यातीळ वाडेगाव येथे पाहण्यास मिळत आहे. 

अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या वाडेगाव येथील हा प्रकार आहे. गेल्या १५ वर्षापासून वाडेगावच्या निर्गुणा नदीपात्रातून शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास सुरूच आहे. वर्षातील १२ महिन्यांपैकी ८ महिने शेतकऱ्यांचा हा जीवघेणा प्रवास चालतो. या निर्गुणा नदीपात्रातील कोल्हापुरी बंधारा तुडुंब भरला. त्यामुळे नदीच्या दुसऱ्या काठावर शेती असलेल्या शेतकऱ्यांचा शेतात जाण्यासाठी असलेला एकमेव रस्ता पूर्णपणे बंद झाला. परिणामी, या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी हा नदीतला जीवघेणा प्रवास करीत नदी पार करावी लागते. 

१५ फूट खोल नदीतून प्रवास 

शेतकरी पुरुष आणि महिलांसह त्यांचे चिमुकले मुलेही या थर्माकोल शिट्स आणि बांबूपासून तयार केलेल्या नावेतून जीवघेणा प्रवास करत आहेत. दरम्यान, वाडेगावच्या निर्गुणा नदी पलीकडे ३० ते ३५ जणांची शेती आहे. आज या शेतकऱ्यांच्या अडचणी पूर्णतः वाढल्या आहेत. इथल्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळं थर्माकोल शिट्स सोबतच बांबूपासून तयार केलेल्या या नावेद्वारे शेतकऱ्यांना १५ फूटपर्यत खोलवर असलेलं नदी पात्र ओलांडावे लागत आहे. 

सरकार लक्ष देणार का? 

यासंदर्भात अनेकदा राजकीय नेते तसेच प्रशासनाच्या शेतकऱ्यांनी तक्रार करत पायऱ्या चढल्या आहेत. मात्र अद्यापही तोडगा निघाला नाही. गेल्या १५ वर्षापासून इथल्या शेतकऱ्यांची शेतीसाठी ही जिद्द सुरु आहे. मात्र, त्यांची जिद्द एकेदिवशी तितकीच धोकादायक ठरू शकते. त्यामुळ मायबाप सरकार या शेतकऱ्यांच्या समस्यांकड आता तरी लक्ष देणार का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breast Cancer Drug: ब्रेस्ट कॅन्सरच्या रूग्णाचा मृत्यू! महागड्या कॅन्सरच्या औषधासाठी तीन वर्षांत ५७ वेळा सुनावणी पुढे, आता थेट सरन्यायाधीशांना पत्र

Bhaji Recipes : झटपट भाजी बनवायचीये? 10 मिनिटांत तयार होणाऱ्या या रेसिपी पाहाच

Maharashtra News Live Update: २०२९ ची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच लढली जाईल

Ketan Agrawal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! 'या' कारणामुळे सिया-चेतन निर्दोष सुटण्याची शक्यता?

Pune : पुणे हादरलं! तरुणाने रिक्षात गळफास घेत आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT