Shruti Vilas Kadam
एका दिवसात किती पाणी प्यावे, हे व्यक्तीचे वय, वजन, आरोग्य, हवामान आणि दैनंदिन शारीरिक हालचालींवर अवलंबून असते.
बहुतेक निरोगी प्रौढांसाठी दिवसाला साधारण 2 ते 3 लिटर (8 ते 12 ग्लास) पाणी पिणे योग्य मानले जाते.
जास्त व्यायाम, धावणे किंवा उन्हात काम करत असल्यास घामाद्वारे पाणी कमी होते. त्यामुळे अतिरिक्त पाणी पिणे आवश्यक आहे.
तहान लागणे हे शरीरात पाण्याची कमतरता सुरू झाल्याचे लक्षण असू शकते. त्यामुळे वेळोवेळी पाणी पिण्याची सवय लावा.
फिकट पिवळ्या रंगाची लघवी म्हणजे शरीरात पुरेसे पाणी आहे. गडद पिवळा रंग दिसल्यास पाण्याचे प्रमाण वाढवण्याची गरज असू शकते.
टरबूज, काकडी, संत्री, टोमॅटो यांसारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळे-भाज्यांमधूनही शरीराला हायड्रेशन मिळते.
दिवसभर थोड्या-थोड्या अंतराने पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते. एकाच वेळी खूप पाणी पिणे टाळावे.