Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात सर्वांनाच सर्वांनाच मका खायला आवडतो. पण त्यावरचे केस आपण लगेचच काढून फेकून देतो. पण हेच केस अनेक आजारांवर खूप गुणकारी असतात.
मक्याच्या केसांमध्ये फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि आवश्यक खनिजे आढळतात.
तुम्ही चहा उकळताना गवतीचहा प्रमाणेच मक्याचे केस उकळवून घेऊ शकता. त्याने शरीरातली सूज हलकी कमी होते.
लघवी करताना होणारी जळजळ किंवा किरकोळ त्रास कमी करण्यासाठी पारंपारिक घरगुती उपाय म्हणून याचा वापर केला जातो.
काही संशोधनांनुसार रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत होईल.
किडनी स्टोन किंवा मुत्रविकारांमध्ये काही लोक हा चहा सहाय्यक उपाय म्हणून पितात.
चहा तयार करण्यासाठी एक मूठ केस दोन कप पाण्यात २ ते ३ मिनिटे उकळून गाळावेत. चवीनुसार लिंबाचा रस किंवा दालचिनी घालू शकता.
दिवसातून एक कप पुरेसा आहे. गर्भवती महिला, किडनीचे रुग्ण, उच्च रक्तदाबाची औषधे किंवा लघवी वाढवणारी औषधे घेणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच सेवन करावे.
ही माहिती सामान्य आरोग्य जागरूकतेसाठी आहे. कोणत्याही आजारावरील उपचारांचा पर्याय म्हणून याचा वापर करू नये. डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.