Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News: घरकुलाला हप्‍ता बँकेतून काढला; रस्‍त्‍यात गाठून महिलेला गंडवलेल्‍या तोतया बँक मॅनेजर ताब्‍यात

घरकुलाला हप्‍ता बँकेतून काढला; रस्‍त्‍यात गाठून महिलेला गंडवलेल्‍या तोतया बँक मॅनेजर ताब्‍यात

जयेश गावंडे

अकोला : बँकेतून घरकुल हप्त्याचे ६० हजार रूपये घेऊन निघालेल्या महिलेला फसवून तिच्याकडील पैसे तोतया बँक मॅनेजरने लांबविले होते. या बँक मॅनेजरला (Akola) अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांनी (Buldhana) बुलडाणा जिल्ह्यातून अटक केली. (Live Marathi News)

मोहम्मद दानिश शेख अकील असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. महिलेवर पाळत ठेवून तिचे पैसे लुबाडल्याची ही घटना गेल्या बुधवारी घडली होती. शिवसेना (Shiv Sena) वसाहतीतील रजनी विनायक चाटी या महिलेला पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. घरकुलाचा ६० हजार रूपये रकमेचा पहिला हप्ता सेंट्रल बँक (Bank) ऑफ इंडियाच्या अग्रसेन भवनासमोरील शाखेत जमा झाला होता.

रस्‍त्‍यात गाठत लांबविले पैसे

बँकेत जमा झालेला हप्‍ता काढण्यासाठी महिला २१ डिसेंबरला दुपारी बँकेत गेली. पैसे काढून महिला घरी पायी जात होती. इतक्यात महिलेवर पाळत ठेवून असलेल्या मोहम्मद दानिश शेख अकील याने पोलिस लॉन्सच्या जवळ तिला गाठले. नोकरी गमावता का?, मी बँक मॅनेजर आहे, तुम्ही बँकेचा फॉर्म भरला नाही, तुमचे खातेही बंद पडेल असे म्हणत ६० हजार रुपये लंपास केले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून पैसे जप्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramayana Yash Look: ३३ किलोचे कपडे, १.८ किलोचा मुकुट; 'रामायण'मध्ये असा साकारला यशचा रावण लूक!

Maharashtra News Live Update: शिवसेना नेते मुकेश जिवतोडे पोलिसांच्या ताब्यात

CO, BDO सह १५ सरकारी अधिकारी तडकाफडकी सस्पेंड; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानं प्रशासकीय वर्तुळात खळबळ

महाकाय अजगरावर मुलांची घसरगुंडी! थरारक VIDEO पाहाच

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या २ सामन्यांत पूर्णपणे बदलणार टीम इंडिया; नव्या कर्णधार-उपकर्णधारासह मैदानात उतरणार

SCROLL FOR NEXT