Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola : अकोला पोलिसात खळबळ; कारवाई टाळण्यासाठी मागितली खंडणी, पोलिसांसह सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल

Akola News : बसस्थानकाच्या आवारात हा प्रकार घडला असून यात पोलीसांकडून काही एक चौकशी न करता तरुणाला मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्याकडून पैशांची मागणी केल्याबाबत तरुणाने तक्रार दिली आहे.

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : तरुणीची छेडखानी केल्याच्या आरोपातून तरुणाला मारहाण करण्यात आली. तर या तरुणावर कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली होती. अर्थात पोलीस कर्मचाऱ्यांकडूनच हा प्रकार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान खंडणी मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यासह बसस्थानकावरील एका सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास सुरु आहे.

अकोला शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात हा धक्कादायक प्रकार घडला असून छेडखानीच्या आरोपावरून एका तरुणाला सुरक्षा रक्षक सुरज इंगळे आणि राहुल इंगळे या पोलीस कर्मचाऱ्याकडून तरुणाला बेदम मारहाण झाली होती. त्यानंतर कारवाई न करण्यासाठी त्याच्याकडून १५०० रुपये घेतले. या प्रकरणात अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलिसांत कारवाईची भीती दाखवत खंडणी घेणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल झाला आहे. दरम्यान, ओम कोरडे असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर राहुल इंगळे असं पोलीस शिपायच आणि सुरज इंगळे असं बस स्थानकाच्या सुरक्षारक्षकाचं नाव आहे. 

दरम्यान, तरुणांनी दिलेल्या तक्रारीनुसार डाबकीरोड येथून परत गावी जाण्यासाठी बस स्थानकावर आलो असताना फलाट क्रमांक तीनवर बसलेलो असतांना अचानकपणे चार - पाच मुली उठून चौकीत गेल्या. त्यानंतर बसस्थानकावर ड्युटी करणाऱ्याने काहीही न विचारता लाथा बुक्यांनी मारहाण करायला सुरूवात केली. यानंतर पोलीस चौकी जवळ घेवून गेला. तेथे असलेल्या एका पोलीसाला सांगितले की हा मुलींची छेड करीत होता. येथेही पोलीसांकडून मारहाण झाली. त्यानंतर दोन हजार रूपये आहेत काय? जमानती साठी बान्डपेपरवर लागणार आहे. अशाप्रकारे दोघांनी खंडणी घेतली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दोघांवर गुन्हा दाखल 

दरम्यान, कारवाई न करण्यासाठी पैसे मागणाऱ्या पोलिस शिपायासह मध्यवर्ती बस स्थानकाच्या सुरक्षारक्षकावर हा गुन्हा दाखल झाला. तर सुरुवातीला पोलिस तक्रार घेण्यास टाळाटाळ करीत होते. मात्र, भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आणि आमदार प्रकाश भारसाकळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर कारवाईला वेग आला. या प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RITES Recruitment: सरकारी नोकरीची संधी! RITES मध्ये भरती सुरु; पगार किती? अर्ज कसा करावा? वाचा सविस्तर

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्षाचा भडका, दोन्ही देशांकडून तुफान गोळीबार

Modi Cabinet Meeting : मोदी सरकारचा मोठा निर्णय; दोन टप्प्यात होणार जनगणना, 11 हजार 718 कोटींचा बजेट मंजूर

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ हजर झाला नाही तर त्याची सर्व मालमत्ता जप्त करणार- पोलिसांचा इशारा

Jahnavi Killekar Photoshoot: निळं आकाश अन् निळी बिकनी, जान्हवीचे बोल्ड फोटो पाहून थायलंडचं वातावरण तापलं

SCROLL FOR NEXT