Akola Bus Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Akola Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस नदीत कोसळली, अयोध्येवरून परत येताना घडली घटना

Bus Plunges Into River: अकोला येथे प्रवासी बस नदीमध्ये कोसळून भीषण अपघात झाला. या बसमध्ये ५० प्रवासी होते. या अपघातामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Priya More

अकोला जिल्ह्यातील बाळापूरनजीक लक्झरी बस पुलावरून खाली कोसळली. भिकूंड नदीच्या पुलावरून बस खाली कोसळून हा अपघात झाला. संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली. बसमधील सर्व प्रवासी हे वाशिम येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. बसमधील प्रवासी हे अयोध्येवरून परत येत होते. बाळापुरजवळील भीकुंड नदीच्या पुलावर या खाजगी बसचा ब्रेक न लागल्याने ही बस पुलावरून नदीत कोसळली.

नदीला जास्त पाणी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कुठलीच जीवितहानी झाली नसून ५० प्रवासी सुखरूप आहेत. यात काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघातानंतर बस चालवणारा क्लीनर फरार झाला आहे. या घटनेचा तपास बाळापूर पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांकडून बसच्या क्लीनरविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहेत.

या अपघातासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघात झालेली लक्झरी बस ही बसमधील क्लीनर चालवत होता. बसच्या क्लीनरला वाहन चालवण्याचा कुठलाही अनुभव नसताना हा बस कसा चालवतो? असा प्रश्नही आमदार नितीन देशमुखांनी साम'शी बोलतांना उपस्थित केला आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. अयोध्येवरून परत येत असताना हा अपघात झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात कोण कोण भाषण करणार?

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT