Akola News Saam tv
महाराष्ट्र

Akola News : अर्ज माघारीदरम्यान भाजप- ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले; अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकार

Akola News : महाविकास आघाडीकडून ते इच्छुक होते. मात्र, मविआमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटेवर गेला. त्यामुळे मिश्रा हे नाराज होते.

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : अकोल्यात निवडणूक अर्ज मागे घेतेवेळी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहण्यास मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालयातल्या अकोला पश्चिम निवडणूक कार्यालयासमोरच हा प्रकार घडला आहे. यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण झाल्याचे पाहण्यास मिळाले.

अकोला (Akola News) पश्चिम मतदारसंघातील ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राजेश मिश्रा यांचे बंड कायम राहिले आहे. राजेश मिश्रा यांनी अकोला पश्चिम मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीकडून ते इच्छुक होते. मात्र, मविआमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटेवर गेला. त्यामुळे मिश्रा हे नाराज होते. त्यांनी (Congress) काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांच्या विरोधात बंड पुकारत अपक्ष उमेदवारी दाखल केला होता. 

दरम्यान आज माघारीचा दिवस असल्याने कोण माघारी घेणार यानंतर मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र राजेश मिश्रा यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. राजेश मिश्रा हे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि शिवसेना शहर प्रमुख आहेत. परिणामी अकोला पश्चिम मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान माघारीचा दिवस असल्याने सर्वच पक्षांचे कार्यकर्ते हे निवडणूक कक्षाच्या ठिकाणी गर्दी करून आहेत. 

तर ठाकरे गटाचे शहर प्रमुख आणि बंडखोर अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष पवन महल्ले यांच्यात राजेश मिश्रा यांनी उमेदवारी मागे न घेतल्यामुळे भाजपच्या उमेदवाराची मते कापली जाणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांनी राजेश मिश्रा याना विरोध केला. यावरून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावले. मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढचा वाद टळला आहे.

ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राजेश मिश्रा यांची उमेदवारी कायम राहिली असून त्यांना 'प्रेशर कुकर' चिन्ह मिळाले. दरम्यान प्रेशर कुकर या चिन्हामुळे आज भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांचा प्रेशर वाढला असल्याचे मिश्रा म्हटले. काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण आणि भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल या दोघांवर राजेश मिश्रा यांनी खोचक टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT