Akola News Saamtv
महाराष्ट्र

Naming Ceremony: ऐकावं ते नवलच! चक्क गायीच्या वासराचं घातलं बारस; आदर्श सोहळ्याची सर्वत्र चर्चा

Maharashtra Update: या आगळ्या वेगळ्या बारशाची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे..

जयेश गावंडे

Cow Calf Naming Ceremony: प्राणीमात्रांवर दया करा, असे आपण नेहमी ऐकतो. प्राणी मात्रांवर प्रेम करणं ही पुण्याचीच गोष्ट. कधी कधी आपल्या घरात असलेल्या पाळीव प्राण्यांचा इतका लळा लागतो की आपल्या घरातल्या सदस्यच वाटतात. त्यामुळे या लाडक्या जनावरांच्या प्रेमापोटी लोक काय करतील ह्याचा काही नेम नाही.

अकोल्यात असाच एक प्रकार समोर आला आहे. अकोल्यातील एका जोडप्याने तर चक्क गायीच्या वासराचं बारसं घातलं आहे. या नामकरण सोहळ्यासाठी सर्वांना आमंत्रित करुन हा सोहळा पार पाडला.. (Akola)

याबाबत अधिक माहिती अशी की, अकोल्यातील बाळापूर नाका येथील टिकार कुटुंबाने आपल्या गायीवरील प्रेमापोटी असा आगळा-वेगळा सोहळा ठेवला आहे. अकोल्यातील बाळापूर नाका येथील पशुपालक डॉ. गजानन टिकार यांच्याकडे कोहिनूर जातिची गाय आहे. नंदिनी या गायीचे नाव. गेल्या दोन तीन महिन्यांपूर्वी टिकार यांच्या आई वडिलांचे निधन झाले.

सर्व घर दुःखात असताना बारा दिवसांपूर्वी त्यांच्या घरी गायीने एका गोंडस पिलाला जन्म दिला. या पिलांचा लळा लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना लागला. दुःख विसरून या कुटुंबाने अगदी पोटच्या मुलासारखे त्याचा नामकरण सोहळा ही केला.

या आगळ्या वेगळ्या बारशाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. गाय ही हिंदू धर्मामध्ये सर्वश्रेष्ठ समजली जाते. प्रत्येकाच्या घरी एक गाय असायला हवी या उद्देशाने हा नामकरण सोहळा सर्वांसाठी मार्गदर्शक सोहळा ठरेल. आपण जन्मलेल्या मुलामुलींचे अनेक बारसे केले मात्र असा सोहळा पहिल्यांदा केल्याची प्रतिक्रिया या वासराचे नामकरण करणाऱ्या महाराजांनी व्यक्त केली. या नामकरण सोहळ्याला परिसरातील नागरिकांनीही हजेरी लावत आदर्श सोहळा असल्याचे म्हटले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update : पुण्यात भाजपचे चौथे पॅनल विजयी, सर्व महिला उमेदवार जिंकल्या

अजित पवारांना मोठा धक्का, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 74 उमेदवार आघाडीवर |VIDEO

Jalgaon Municipal Election Result: भाजपनंतर राष्ट्रवादीनं उघडलं विजयाचं खातं; बंडखोर उमेदवाराचा दारूण पराभव

Biscuit Side Effect: नाश्त्याला रोज बिस्किट खल्ल्याने शरिरावर कोणता वाईट परिणाम होतो?

Masala Khichdi Recipe: हॉटेलसारखी मसाला खिचडी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT