Akola Akot Taluka Youth Death Saam TV
महाराष्ट्र

Akola News : शेतातून घरी परतताना घात झाला, अंगावर वीज कोसळून 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू, कुटुंबाचा आधार हरपला

Akola Latest News : अचानक आलेल्या या विजेच्या कडकडाटात दुर्गेश यांच्या अंगावर वीज पडली. त्याला उपचारासाठी तात्काळ डॉक्टरांकडे नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी दुर्गेशला मृत घोषित केले

Satish Daud

अक्षय गवळी साम टीव्ही अकोला

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यासह काही भागात गुरुवारी (ता. २२) ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. मुसळधार पावसाने अक्षरशा अकोट तालुक्यातल्या काही गावांना झोडपून काढलं. तर या पावसाच्या तडाख्यात एक दुःखद घटना घडली. एका शेतकरी पुत्राचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्गेश आनंदा पळसपगार (वय 24) असे या मृत तरुणाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पाळोदी या गावात सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट पाहायला मिळाला. अचानक आलेल्या या पावसाने ग्रामस्थ्यांची तारांबळ उडाली. गुरं-ढोरं चारणारे शेतकरी आणि गावकरी या मुसळधार पावसात अडकले. या वेळेस आपल्या शेतातील काम संपवून, बकऱ्यांना घेऊन दुर्गेश आनंदा पळसपगार घरी परतत होते.

दुर्गेश आपल्या गावी, पाळोदी, काही अंतरावरच पोहोचले होते, तेव्हा नियतीने त्यांच्यावर घात केला. अचानक आलेल्या या विजेच्या कडकडाटात दुर्गेश यांच्या अंगावर वीज पडली. त्याला उपचारासाठी तात्काळ डॉक्टरांकडे नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी दुर्गेशला मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण पाळोदी गाव शोककळा पसरली.

दुर्गेश हा एक मेहनती आणि कष्टाळू शेतमजूर होता, आणि त्यांच्या कुटुंबासाठी तो महत्वाचा आधार होता. त्याच्या मृत्यूनं कुटुंबीयांना धक्का बसलाय. दुर्गेश याचे वडील अकोल्यातील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करतात, आणि दुर्गेश मिळेल ते काम करून आपल्या वडिलांना हातभार लावण्याचा प्रयत्न करत होते.

दुर्गेश याच्या पश्चात कुटुंबात पत्नी आणि त्यांची दोन लहान मुलं आहे. त्याच्या जाण्याने या कुटुंबाचे भविष्य अंधारात गेले आहे. दरम्यान आज सायंकाळच्या झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशा अकोट तालुक्यातल्या मरोडासह अन्य काही गावांना झोडपून काढलंय. खारपाण पट्ट्यात शेतीचं मोठ नुकसान झालंय.

या संततधार झालेल्या पावसामुळ शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं.. त्यामुळं शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी पिकाच नुकसान झाले आहे. नुकत्याच काही शेतकऱ्यानी पारंपारीक पिकावर कीटकनाशक आणि रासायनिक खत वापरले होते, पावसाच्या पाण्यात हे खत वाहून गेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT