Akola Crime News : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली आहे. श्रीकांत संजय राऊत असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. श्रीकांतचा मृतदेह आज अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव जवळ एका नाल्यामध्ये तरंगताना आढळून आला. त्याने विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा पोलिसांना संशय आहे. (Latest Marathi News)
स्पर्धा परीक्षा देत असताना श्रीकांत राऊत हा सेंट्रल बँकेत नोकरीवर रुजू झाला होता. मात्र कलेक्टर व्हायचं स्वप्न असल्याने त्याने नोकरीचा राजीनामा दिलेला होता. श्रीकांत संजय राऊत (वय ३० राहणार पटवारी कॉलनी, ता. मूर्तिजापुर, जि. अकोला.) हा स्पर्धा परिक्षेची तयारी करत होता.
श्रीकांत स्पर्धा परीक्षा देत असताना सेंट्रल बँकेत त्याची एका महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली होती. परंतु श्रीकांत याचा सख्खा चुलत भाऊ आयएएस अधिकारी असल्याने त्यालाही आयएएस अधिकारी व्हायचं होतं. यासाठी त्याने सेंट्रल बँकेतील पदाचा राजीनामा दिला होता.
त्यानंतर श्रीकांतने मुर्तीजापूर शहरातच दोन वेगवेगळ्या ग्रंथालयात एमपीएससी-यूपीसीएसची तयारी सुरू केली. त्याचं मुख्य टार्गेट कलेक्टर व्हायचं होतं. यासाठी तो प्रत्येक स्पर्धा परीक्षाचा सराव करायचा, अन् ज्या विभागात जागा निघतील त्याची परीक्षाही द्यायचा.
हल्लीच त्याने एमपीएससीची परीक्षा देत त्यात चांगले गुणही मिळवले. तसेच त्याची मुलाखत मुंबई इथे घेण्यात आली. मात्र परीक्षेचा अंतिम निकाल हाती याअगोदरच श्रीकांत याने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.