Akola Municipal Mayor News Saam Tv
महाराष्ट्र

Akola : अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी हाय व्होल्टेज पॉलिटिक्स, कोणत्या पक्षाचा महापौर होणार?

Akola Municipal Mayor News : अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. भाजप, काँग्रेससह अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या भूमिकेमुळे महापौर पदाची लढत रंगतदार ठरत आहे.

Alisha Khedekar

  • अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी हाय व्होल्टेज पॉलिटिक्स

  • अपक्ष आणि छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक

  • भाजप आणि काँग्रेसकडून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न

  • महापौर पदाच्या आरक्षणानंतर चित्र स्पष्ट होण्याची शक्यता

अक्षय गवळी, अकोला

महाराष्ट्रात नुकत्याच महापालिका निवडणुकांचा धुरळा उडाला. या निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपची सत्ता आलेली पाहायला मिळाली. त्यांनतर आता अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 'हाय व्होल्टेज पॉलिटिक्स' पाहायला मिळते आहे. या सत्तेच्या खेळात अकोल्यात प्रत्येक नगरसेवक आणि अगदी छोट्या पक्षांनाही प्रचंड महत्व आलं आहे.

अकोल्यात भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रत्येकी १ नगरसेवक विजयी झाले आहे. तर दोन अपक्ष विजयी झाले आहेत. यात आशिष पवित्रकार हा भाजपचा बंडखोर अपक्ष आहे. तर दुसरा अपक्ष हा भाजपने पुरस्कृत केलेले चांद भोजा चौधरी आहे. त्यामुळे भाजपने आपण सहज महापालिकेवर सत्ता स्थापन करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

दुसरीकडे २१ जागा जिंकलेल्या काँग्रेसने भाजपा पक्षांना एकत्र करीत सत्ता स्थापनेचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर सत्ता स्थापनेत महत्वाची आणि 'किंगमेकर'ची भूमिका असलेल्या वंचित आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र सावध भूमिका घेतली आहे . दोन्ही पक्षांनी काँग्रेसच्या भूमिकेनंतर भूमिका घेणार असल्याचं सांगत सस्पेन्स वाढवला आहे.

अकोला महापालिकेतला सत्तासंघर्ष हा महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर अधिक तीव्र होणार आहे. तोपर्यंत कोण कुठे जातो? अन कुणासोबत युती करत सत्तेत बसतो?, याचं चित्र पुढच्या दोन दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान आता सर्वांचेच लक्ष अकोल्यातील महापालिकेच्या महापौर पदाच्या खुर्चीत कोण बसणार याकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Update: निवडणुकीत मोठा बदल? EVMला ब्रेक, बॅलेट पेपर पुन्हा येणार?

Wednesday Horoscope : तुमच्या संपत्तीत वाढ होणार, दिवस चांगला जणार; ५ राशींच्या लोकांसाठी बुधवार गेमचेंजर ठरणार

Maharashtra Live News Update: शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल; असीम सरोदे यांचा दावा

Crime News: मध्यरात्र, बंद खोली आणि पतीचं वेगळंच कृत्य...; संतप्त पत्नीने पतीची जीभच कापली, नेमकं काय घडलं?

साहेब, युती तोडा! भाजप कार्यकर्त्यांचा भररस्त्यात राडा ; ZPचा फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा

SCROLL FOR NEXT