अकोला महापालिकेत महापौर निवडीआधी जोरदार राडा झालाय...भाजपच्या शारदा खेडकर यांची महापौरपदी निवड होताच काँग्रेस आणि एमआय़एमचे नगरसेवक एकमेंकाशी भिडलेत...आणि याला कारण ठरलयं... महापौर निवडीत एमआयएमच्या 3 नगरसेवकांनी तटस्थ राहण्याची घेतलेली भूमिका...त्यामुळे या राड्यात काँग्रेस नगरसेवकांनी थेट एमआयएमच्या नगरसेवकांवर बांगड्या फेकल्यात...अकोला महापालिकेत निकालातील पक्षीय बलाबलानंतर महापौरपद नेमकं कोणाकडे जाणार, हे स्पष्ट होतं...
भाजप : 38
शिंदे सेना : 01
राष्ट्रवादी काँग्रेस (AP) : 01
राष्ट्रवादी काँग्रेस (SP)
एकूण - 43
काँग्रेस : 21
उबाठा : 06
वंचित : 05
एमआयएम : 03
अपक्ष : 02
एकूण - 37
भाजपच्या जागा अधिक असूनही महापौर पदासाठी काँग्रेस विरोधकांना एकत्र करून सत्तास्थापनेच्या प्रयत्नात होती... मात्र महापौर पदाच्या निवडीवेळी एमआयएमची तटस्थ भूमिका आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं सत्तेसोबत जुळवून घेणं... भाजपच्या पथ्यावर पडलयं... त्यामुळे 'कटेंगे तो बटेंगे'चा नारा देणारी भाजप सत्तेसाठी 7 मुस्लिम नगरसेवकांना सोबत घेते, असा टोला ठाकरेसेनेच्या आमदारांने लगावलाय... तर भाजपाने बहुमतांसाठी 3 कोटी रुपये नगरसेवकाला दिल्याचा आरोप काँग्रेस आमदार साजिद पठाण यांनी केलाय...
अकोला महापालिकेत महापौरपदाच्या ठाकरेसेनेच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा पराभव करत शारदा खेडकर यांनी 45 मतं मिळवलेत... तरीही 48 जागांवरून 38 जागा जिंकणाऱ्या भाजपमध्ये अस्वस्थता आहे...त्यामुळे 10 जागांवरील पराभवामागे हात असणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करू, असा इशारा भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी दिलीय...
अकोला महापालिकेत वंचित आणि काँग्रेसच्या पॅटर्नची चांगलीच चर्चा रंगली होती... मात्र विरोधकांची एकी न टिकल्यानं अकोल्यात भाजपला सत्ता राखण्यात यश मिळालयं... आता हातातोंडाशी आलेला घास भाजपच्या पथ्यावर पडल्यानं काँग्रेस आणि एमआयएममधील तणाव जिल्हा परिषद निवडणुकीतही पाहयाला मिळणार आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.