Akola Jawan praveen janjal martyr Saam TV
महाराष्ट्र

Akola News : अकोल्यातील जवान जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद; वर्षभरापूर्वीच झालं होतं लग्न

Akola Jawan praveen janjal martyr : अकोला जिल्ह्यातील जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं.

Satish Daud

अक्षय गवळी, साम टीव्ही अकोला

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शनिवारी दहशतवादी हल्ला झाला. यावेळी भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देत ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र, दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत असताना लष्करातील दोन जवानांना वीरमरण झालं. यामध्ये अकोला जिल्ह्यातील एका जवानाचा समावेश आहे. प्रवीण प्रभाकर जंजाळ (वय २४) असं शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे.

प्रवीण हे मोरगाव भाकरे गावातील (Akola News) रहिवासी होते. २०२० मध्ये ते सेंकड महार बटालियनमध्ये भरती झाले होते. तेव्हापासून त्यांची पोस्टिंग मणिपूरमध्ये होती. मात्र, ४ महिन्यांपूर्वी प्रवीण यांना सैन्यदलाच्या राष्ट्रीय रायफलच्या क्रमांक एकच्या तुकडीत जम्मू-काश्मीर येथे पाठवण्यात आले होते.

दुर्दैवी बाब म्हणजे, प्रवीण यांच्या लग्नाला नुकतंच एक वर्ष झालं होतं. दरम्यान, दहशतवाद्यांशी लढताना प्रवीण यांचं वीरमरण आल्याची वार्ता भारतीय लष्कराकडून (Indian Army) जंजाळ कुटुंबियांना देण्यात आली. यामुळे जंजाळ कुटुंबियांसह संपूर्ण मोरगाव भाकरे गावावर शोककळा पसरली आहे.

प्रवीण यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, भारतीय लष्कराने दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत ४ जणांना ठार केलं आहे. अन्य चार जण अजूनही परिसरात लपून बसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती.

सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली, त्यानंतर दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. या हल्ल्यात अकोल्यातील जवान प्रवीण जंजाळ यांच्यासह अन्य एक जवान शहीद झाला आहे. जंजाळ शहीद झाल्याची माहिती गावापर्यंत पोहोचताच गावात शोककुल वातावरण पसरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंदोलनानंतर बँकांची मराठींसाठी मेगाभरती? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Politics : निवडणुकीआधी अजित पवारांची ताकद वाढली, एकाचवेळी ४०० कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Mumbai Crime : मुंबईत रिक्षा चोरांचा सुळसुळाट; ७ ऑटोरिक्षा रस्त्यावरून लंपास, पोलिसांकडून दोघांना अटक

Reshma Shinde : अभिनेत्री रेश्मा शिंदे आई तुळजाभवानीच्या दर्शनाला, पाहा फोटो

दारूच्या नशेत तरुण थेट रेल्वे ट्रॅकवर झोपला, ट्रॅकमनने वेळीच बाहेर खेचलं; कर्मचारी रविकुमार यांचं सर्वत्र कौतुक

SCROLL FOR NEXT