Akola Mayor Candidate  Saam Tv
महाराष्ट्र

Akola Mayor: अकोल्याला आज महापौर मिळणार, कोण बसणार खुर्चीवर? भाजप सत्ता कायम राखणार का?

Akola Mayor Candidate: अकोला महानगर पालिकेला आज महापौर आणि उपमहापौर मिळणार आहे. ४ वर्षानंतर या महापालिकेला महापौर मिळणार आहे. महापौर आणि उपमहापौरपदाच्या खुर्चीवर नेमकं कोण बसणार हे काही तासांत कळेल.

Priya More

Summary -

  • अकोला महानगरपालिकेला आज चार वर्षांनंतर नवे महापौर आणि उपमहापौर मिळणार

  • महापौरपदासाठी भाजप आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेत थेट लढत

  • भाजप आघाडीने 44 नगरसेवकांचा गट नोंदवला असून बहुमताचा दावा केला

  • सकाळी 11 वाजता विशेष सभेत मतदान होणार

अक्षय गवळी, अकोला

आज अकोल्यात महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक होत आहे. महापौरपदासाठी भाजपच्या शारदा खेडकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुरेखा काळे यांच्यात लढत होणार आहे. तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे आझाद खान आणि भाजपचे अमोल गोगे यांच्यात लढत होत आहे. महापौरपदासाठी भाजपकडून उमेदवारी दाखल केलेल्या कल्पना गोटफोडे माघार घेणार आहेत.

तर उपमहापौरपदासाठी उमेदवारी दाखल केलेले अमोल मोहोकार आणि अपक्ष आशिष पवित्रकार उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. भाजपने 80 सदस्यांच्या अकोला महापालिकेत अकोला सुधार आघाडी नावाने 44 नगरसेवकांचा गट नोंदणीकृत केला आहे. यामध्ये भाजपचे 38, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, शिंदे सेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि अपक्ष प्रत्येकी एक असे 44 सदस्यांचा यात समावेश आहे.

मात्र, काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि भाजपचे बंडखोर अपक्ष आशिष पवित्रकार यांच्या एकत्रित आघाडीने महापालिकेत चमत्कार होण्याचा दावा केला. काल रात्रभर दोन्ही आघाड्यांमध्ये बैठकांचे सत्र चालले. भाजपने आपल्या आघाडीतील सर्व नगरसेवक शहराबाहेरच्या सिटी स्पोर्ट क्लब येथे ठेवले आहे.

सकाळी 11 वाजतानंतर महापालिकेच्या विशेष सभेत नव्या महापौर-उपमहापौरांची निवड होणार आहे. शहराला तब्बल चार वर्षांनंतर नवे कारभारी मिळणार आहेत. त्यामुळे अकोल्यात भाजपचा महापौर होत सत्ता कायम राखली जातेय काय?. किंवा चमत्काराची भाषा बोलत असलेले विरोधक यशस्वी होतात? याची उत्सकुता लागलीये.

अकोला महापालिकेतील पक्षीय बलाबल -

एकूण जाग : 80

बहुमताचा आकडा : 41

भाजप : 38

काँग्रेस : 21

उबाठा : 06

शिंदे सेना : 01

अजित राष्ट्रवादी : 01

शरद राष्ट्रवादी : 03

वंचित : 05

एमआयएम : 03

अपक्ष : 02

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT