akola News  Saam tv
महाराष्ट्र

Akola Toilet Story : टॉयलेट नाही घरी, बायको गेली माहेरी; सासरी परतण्यासाठी ठेवली एक अट, वाचा सविस्तर

Akola Latest news : टॉयलेट एक प्रेमकथा या सिनेमातील कथेला शोभेल असाच एक प्रकार घडलाय महाराष्ट्रात...घरात टॉयलेट नाही म्हणून पत्नीने थेट माहेर गाठलंय...सासरी परत येण्यासाठी तिने आता एक अट ठेवलीय....काय आहे हा प्रकार पाहुयात हा रिपोर्ट...

Bharat Mohalkar

अकोला जिल्ह्यातील दिग्रसचे विकास तायडे...भाऊ-भावांच्या संपत्तीची वाटणी झाली आणि शौचालय मोठ्या भावाला मिळालं... त्यानंतर विकासकडे शौचालय राहिलं नाही... त्यामुळे विकासच्या बायकोचा संयम तुटला आणि तिने थेट माहेर गाठलं. आता जोपर्यंत शौचालय बांधणार नाही तोपर्यंत परत न येण्याची अट विकासच्या बायकोनं घातलीय. त्यामुळे अकोल्यातील हा प्रसंग राज्यात चर्चेचा विषय ठरलाय.

बायको माहेरी गेल्यानंतर विकासने पत्नीला घरी परत येण्याची विनंती करत शौचालय बांधण्याचं आश्वासन दिलंय... विकास म्हणतो, मी 300 रुपये रोजाने मजुरीवर जातो.. त्यात घरखर्च.. आता मी शौचालय बांधण्यासाठी कर्जही काढलंय..पण शौचालयाचं पाणी कुठं सोडायचं हा प्रश्न पुढं उभा ठाकलाय.

मी ग्रामपंचायतीकडे विनंती केली.. शौचखड्डाही खोदण्याची परवानगी मागितली... मात्र त्यानंतरही मला ग्रामपंचायतीने परवानगी दिली नाही... आता ग्रामपंचायत शौचालय बांधण्यासाठीच ग्रामपंचायतीची आडकाठी आहे.. तर दुसरीकडे पत्नी माहेरी गेल्याने इकडे आड तिकडे विहीर झालीय... त्यामुळं मी गटविकास अधिकाऱ्याकडे ग्रामपंचायतीविरुद्ध तक्रार केल्याची माहिती विकासने दिलीय..

देशाचे पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशातील महिलांच्या सन्मानासाठी स्वच्छ भारत योजनेच्या अंतर्गत घरोघरी शौचालय बांधण्याबाबत घोषणा केली होती... त्याची अंमलबजावणीही सुरु झाली... गावातील भींतींवर शौचालयासंबंधी घोषणा लिहील्या गेल्या...गावात दवंडीही पिटली जाऊ लागली आणि जो उघड्यावर शौचास जाईल त्याच्यासाठी दंडाचीही घोषणा झालीय...मात्र यानंतरही गावं हागणदारीमुक्त झाली नसल्याचं भीषण वास्तव समोर आलंय..

पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधण्यासाठी ग्रामपंचायतीने 12 हजार रुपयांची मदत करणं अपेक्षित असताना आता दिग्रसमध्ये मात्र नागरिकांचीच कोंडी केली जातेय... त्यामुळे विकास अडचणीत सापडलाय...

घरात टॉयलेट नसल्यामुळे टॉयलेट एक प्रेमकथा सिनेमात दाखवल्याप्रमाणेच विकासची पत्नी माहेरी निघून गेलीय. यात विकास टॉयलेट बांधण्यासाठी धडपड करतोय.. मात्र एकीकडे दंडाची घोषणा करणारी ग्रामपंचायत आणि प्रशासनच त्याच्या शौचालय बांधण्याच्या इच्छेच्या आड येत असल्याचं चित्र आहे... त्यामुळे आतातरी ग्रामपंचायत विकासला शौचालय बांधण्यासाठी मदत करणार की त्याची बायकोला सासरी आणण्यासाठीची ससेहोलपट कायम राहणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT