Akola Lawyer Arrested for Molesting Senior Female Judge Saam Tv News
महाराष्ट्र

Akola: धक्कादायक! महिला अधिकाऱ्याचा वकिलाकडून विनयभंग; अश्लील मेसेज अन् कार्यलयात घुसून त्रास, नेमकं काय घडलं?

Advocate Harasses Woman Judge: अकोल्यातील न्यायालयात उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग. आरोपी वकील सौरभ तेलगोटे अटकेत. सोशल मीडियावरही अश्लील मजकूर. पोलीस कोठडीत २२ जुलैपर्यंत.

Bhagyashree Kamble

अक्षय गवळी, साम टिव्ही

न्याय देणाऱ्या संस्थेतच जर महिलाच असुरक्षित असतील, तर सामान्य महिलांचं काय? असा सवाल निर्माण करणारी धक्कादायक घटना अकोल्यातून समोर येत आहे. एका विकालानं न्यायालयातील एका उच्चपदस्थ महिलेचा अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वकिलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सौरभ दीपांकर तेलगोटे असे आरोपी वकिलाचे नाव असून, गेल्या वर्षभरापासून सौरभ तेलगोटे हा पीडित उच्च पदस्थ अधिकारी महिलेला त्रास देत होता. तक्रारीनुसार, गेल्या वर्षभरापासून तेलगोटे पीडित महिलेला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. त्याने समाजमाध्यमांवर अश्लील संदेश पाठवणे, अश्लील चॅटिंग करणे, अश्लील इशारे करणे यासारख्या प्रकारांनी पीडितेचा छळ केला.

तसेच महिलेच्या कार्यालयात थेट घुसून वारंवार गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं रामदास पेठ पोलीस ठाणे गाठले. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांतर्गत आरोपी सौरभ दीपांकर तेलगोटेवर गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने आरोपीला २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, न्यायालयातच एका उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याचा सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ करण्याचा प्रयत्न झाल्याने अकोल्याच्या न्यायालयीन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

वकिलाने अशाप्रकारे दिला त्रास...

महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, न्यायालयाच्या ब्रेकमध्ये शिपाई वकिलाचा निरोप घेऊन गेला. नंतर तेलगोटे वकीलांना २ मिनिटे बोलायच असं सांगितलं. त्यादरम्यान वकिलासोबत बोलायला वेळ नाही असं महिलेनं सांगितलं. त्यानंतर वकील डायसवरून चढून चेंबरमध्ये घुसला, तो दिसताच तुम्ही आतमध्ये कसे काय आलात? बाहेर निघा म्हणून महिला अधिकाऱ्याने वकिलाला हटकलं.

पुढं महिलेनं चेंबरमधील बेल जोरजोरात वाजवली. शिपाई चेंबरमध्ये दाखल झाले तरी देखील तेलगोटे वकीलाचा दोन मिनिट बोलण्यासाठी हट्ट कायम होता. या दरम्यान शिपायासोबत धक्काबुक्की देखील झाली. त्यानंतर वरिष्ठांकडे या यासंदर्भात न्यायाधीशांनी तक्रार केली.. इथेच तो थांबला नाही तर त्याने वेगवेगळ्या इंस्टाग्राम अकांटवर अश्लील अपमानास्पद, मानहानीकारक व चारित्र हनन करण्याच्या स्वरूपाच्याच्या पोस्ट केल्या आहेत. याच कारणावरून महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर अन् अशोक सराफ पुन्हा एकत्र, सेटवरचा फोटो समोर

Shocking: लघवी पाजली, नाकाला बूट लावत मानेवर पाय; गैरफायदा घेत भोंदूबाबाचे अमानुष कृत्य, VIDEO व्हायरल

Weather Update : राज्यात पावसाचा ब्रेक! पुढील 5 दिवस पावसाचा जोर कमी, हवामान विभागाचा अंदाज | VIDEO

Viral News : एकमेकींचे केस धरले, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; २ महिला वकिलांचा भररस्त्यात राडा; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: वाटद एमआयडीसी विरोधात आज होणार शेतकऱ्यांची जनआक्रोश सभा

SCROLL FOR NEXT