MLA Nitin Deshmukh on Chandrashekhar Bawankule Saam Tv
महाराष्ट्र

Nitin Deshmukh on Chandrashekhar Bawankule: 'बावनकुळे मतिमंद', उद्धव ठाकरेंवरील टीकेवर नितीन देशमुख संतापले

Akola Latest News: 'बावनकुळे मतिमंद', उद्धव ठाकरेंवरील टीकेवर नितीन देशमुख संतापले

साम टिव्ही ब्युरो

MLA Nitin Deshmukh on Chandrashekhar Bawankule: ''चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) हे स्वतः मतिमंद आहेत'', असं म्हणतं ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी बावनकुळेंवर खोचक टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नागपूरला कलंक, अशी टीका केली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत जर फडणवीसांवर बोलाल तर नागपूरची जनता ठाकरेंना जोडे मारेल, असं म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेनंतर नितीन देशमुख हे आक्रमक झाले आहेत.

त्यांनी बावनकुळे यांना मतिमंदाची उपमा दिली आहे, तर तुम्ही उद्धव ठाकरे यांना जर चपलांनी मारण्याची भाषा कराल तर आम्ही शिवसैनिकांनी काही बांगड्या भरल्या नाहीत, असं म्हणतं ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी बावनकुळे यांना टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी तुमच्या बाजूने बसण्या अगोदर ज्या पंतप्रधानांनी एका भाषणाद्वारे राष्ट्रवादीवर 70 हजार कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप लावला होता, त्याच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी तुमच्या सोबत आली, शपथविधी झाला मग हा महाराष्ट्राला कलंक नाही का?, असं देशमुख म्हणाले आहेत.

ज्या राष्ट्रवादीवर तुम्ही 70 हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप लावला होता आणि त्यानंतर सत्ता स्थापन केली मग तुम्ही केलेल्या राष्ट्रवादी वर या आरोपाला नेमकं आम्ही म्हणायचं तरी काय? असा प्रश्न राज्यातील प्रत्येक तरुणाला विचारण्याचा अधिकार आहे, असंही ते म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

हा कलंक पंतप्रधानाने या महाराष्ट्राला लावलेला आहे. तुम्ही लावलेला आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे जे काही बोलले ते योग्य बोलले. तुम्ही जर चपला मारण्याच्या गोष्टी कराल तर आम्ही काही बांगड्या भरल्या नाहीत, अशी प्रतिक्रिया आमदार नितीन देशमुख यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget Plan: जिओनंतर 'या' कंपनीने दिला धक्का! लोकप्रिय आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन आता बंद

Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

SCROLL FOR NEXT