India Chandrayaan-3 Mission : चंद्रयान 3 मोहिमेत मुंबईचा सिंहाचा वाटा; विक्रोळीचं खास कनेक्शन

ISRO Chandrayaan-3 : चंद्रयानाला उर्जा देणारे इंजिन मुंबईतील प्लांटमध्ये तयार करण्यात आले आहे.
Chandrayaan-3 To Be Launched On This Day
Chandrayaan-3 To Be Launched On This DaySAAM TV
Published On

Chandrayaan 3 : भारतासाठी १४ जुलै हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. चंद्रयान-3 मोहिमेच्या प्रक्षेपणाकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. चंद्रयान 3 मोहिमेला गोदरेज कंपनीने तेखील हातभार लावला आहे. चंद्रयानाला उर्जा देणारे इंजिन मुंबईतील प्लांटमध्ये तयार करण्यात आले आहे.

'चंद्रयान-3' शुक्रवारी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित होणार आहे. मुंबईतील विक्रोळी येथील गोदरेज कंपनीने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (ISRO) मुख्य घटकांचा पुरवठा केला आहे. चंद्रयान-३ साठीची अनेक उपकरणे येथे तयार करण्यात आली आहेत. (Latest News Update)

Chandrayaan-3 To Be Launched On This Day
Chandrayaan 3 Launch Confirm Date : चांद्रयान प्रक्षेपणाची निश्चित तारीख आणि वेळ ठरली, या दिवशी अवकाशात झेपावणार

गोदरेजचा इस्रो संबंध

सर्व लिक्विड इंजिन आणि सॅटेलाइट थ्रस्टर्स मुंबईतील विक्रोळी येथील सुविधेमध्ये तयार करण्यात आले आहेत. ही सर्व स्वदेशी उत्पादने आहेत. भारताच्या वाढत्या अवकाश क्षेत्रासाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. गोदरेज 30 वर्षांहून अधिक काळ इस्रोशी संबंधित आहे.

Chandrayaan-3 To Be Launched On This Day
Mumbai Online Fraud: बापरे! २५ समोस्यांची किंमत दीड लाख रुपये... मुंबईतल्या डॉक्टरला धक्का; एका झटक्यात बँक खातं रिकामं

भारत चौथा देश बनणार

चंद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर आपले अंतराळ यान उतरवणारा भारत हा चौथा देश बनणार आहे. चंद्रयान-३ मोहिमेचे मुख्य लक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि यशस्वी लँडिंग करणे हा आहे. 23 किंवा 24 ऑगस्टच्या सुमारास चंद्रावर 'सॉफ्ट लँडिंग' करण्याचा प्रयत्न करेल, असे इस्रोच्या अध्यक्षांनी सांगितलं होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com