Akola News Saam Tv
महाराष्ट्र

Akola News : भाविकांवर काळाचा घाला, भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, ८ जण गंभीर

Akola Accident News : अकोला जिल्ह्यातील शिवनी परिसरात पातूर येथून गंगाजल घेऊन परतणाऱ्या कावड यात्रेतील भाविकांवर ट्रकने धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू व आठ जण जखमी झाले आहेत.

Alisha Khedekar

  • अकोल्याजवळ कावड यात्रेतील ट्रॅक्टरवर ट्रकची धडक, दोन ठार

  • पातूर येथील भाविकांचा देवकुंडहून परतीचा प्रवास

  • ट्रॅक्टर पलटी होऊन जखमी भाविकांची अवस्था गंभीर

  • गावात शोककळा; पोलिसांकडून ट्रकचालकाविरोधात कारवाई सुरू

अकोला जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील देवकुंड येथून गंगाजल घेऊन परतीच्या प्रवासात असलेल्या कावड यात्रेतील भाविकांच्या गटावर भीषण अपघातात काळाने झडप घातली. रात्रीच्या सुमारास शिवनी परिसरात कावड यात्रेमागून येणाऱ्या रेतीने भरलेल्या ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. त्यामुळे ट्रॅक्टर पलटी होऊन थेट भाविकांच्या अंगावर उलटला. या अपघातात दोन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सात ते आठ भाविक गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातात बंडू पांडुरंग बंड आणि अविनाश पोहरे यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृत आणि जखमी भाविक हे अकोल्यातील पातूर शहरातील असल्याचे समजते. जय तपे हनुमान व्यायाम शाळेच्या वतीने ही कावड यात्रा काशी विश्वनाथ अर्थात देवकुंड येथून गंगाजल आणण्यासाठी निघाली होती. यात्रेनंतर गंगेचे पाणी घेऊन परत येत असताना हा अपघात घडल्याने साऱ्या गावात शोककळा पसरली आहे.

अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्या पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दुर्घटनेने पातूर शहरात शोककळा पसरली असून गावकरी आणि नातेवाईक हळहळ व्यक्त करत आहेत. एक धार्मिक आणि श्रद्धेचा प्रवास दुर्दैवाने अशा दुर्घटनेत संपल्याने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले आहेत.

ही दुर्घटना कुठे घडली?

अकोला जिल्ह्यातील शिवनी परिसरात ही भीषण दुर्घटना घडली.

किती लोकांचा मृत्यू झाला आहे?

या अपघातात दोन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ही यात्रा कोणत्या ठिकाणाहून आली होती?

उत्तर प्रदेशातील देवकुंड येथून गंगाजल घेऊन परतणारी कावड यात्रा होती.

अपघाताची कारणं काय होती?

रेती भरलेल्या ट्रकने कावडच्या मागे असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली, ज्यामुळे ट्रॅक्टर पलटी होऊन भाविकांच्या अंगावर पडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोल्हापूर स्पेशल! CSMT ते कोल्हापूर दरम्यानचा प्रवास होणार अतिजलद; जाणून घ्या किती असेल रेल्वे तिकीट, अन् थांबे

Maharashtra Live News Update: नांदेडचे रामभक्त निघाले सायकलवर अयोध्येला

Olya Naralachi Vadi Recipe: गूळ घालून बनवा ओल्या नारळाच्या वड्या, फक्त 10 मिनिटांत होईल रेसिपी

Manoj Jarange Patil:मराठा आणि ओबीसी दंगल घडवण्याचा खटाटोप सुरू; मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

Rahul Gandhi : जनता काँग्रेसच्या प्रश्नांची उत्तरे मागतंय, म्हणून निवडणूक आयोगानं...; राहुल गांधींचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT