Former NCP MLA Tukaram Bidkar 
महाराष्ट्र

NCP Leader Accident: राष्ट्रवादीचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे अपघातात निधन

Former NCP MLA Tukaram Bidkar: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा अपघात झालाय. त्यांच्या दुचाकीला एका मालवाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षय गवळी, साम प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या दुचाकीचा अपघात झाला यात त्यांचे निधन झाले आहे. माजी आमदार दुचाकीने जात असताना एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात तुकाराम बिडकर गंभीर स्वरूपात जखमी झाले होते, त्यांना बिडकर यांचा अपघात अकोल्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरील शिवणी जवळ झाला होता. बिडकर त्यांच्यावर अकोलामधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, त्याचदरम्यान त्यांचा मृत्यू झालाय.

अकोला जिल्ह्यातील अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मुर्तीजापुरचे माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड यांचे अपघातात निधन झाले. अकोलामधील शिवणी शिवर गावाजवळील पेट्रोल पंपासमोर एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अकोला विमानतळावर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बावनकुळे यांना विमानतळवर भेटले होते. बावनकुळे यांना भेटून बिडकर दुचाकीने घरी येत होते.

बिडकर यांची दुचाकी शिवर गावाजवळ आली असताना त्यांच्या दुचाकीला मालवाहू टेम्पोने धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

तुकाराम बिरकड यांनी 2004 ते 2009 या काळात आमदारकी भुषवली होती. मुर्तीजापूर मतदारसंघाचे आमदार होते. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात होते विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष होते. विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचा माळी समाजातील मोठा चेहरा होते. आमदार होण्याआधी तुकाराम बिडकर अकोला जिल्हा परिषदेत सभापती होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना मारहाण, शरीराला अनेक फ्रॅक्चर?

Maharashtra Live News Update: जयसिंगपूरमध्ये 24 वी ऊस परिषद पार, १८ ठराव पास

BMC Election : महायुतीच्या जागावाटपाआधीच रामदास आठवलेंनी बॉम्ब फोडला; मुंबईतून दोन उमेदवारांची केली घोषणा

Manoj Jaranage: जरांगेंचं आंदोलन ठरलं फुसका बार? तायवाडेंनी केली कुणबी प्रमाणपत्रांची पोलखोल

Ayushman Bharat Yojana: आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोणकोणत्या सेवा मोफत मिळतात?

SCROLL FOR NEXT