Akola drug peddler Gabbar Jamadar Saam Tv News
महाराष्ट्र

Drugs: ड्रग्स माफियाचा पोलिसांवर पैसे उधळण्याचा VIDEO व्हायरल; शिंदे सेनेच्या नेत्यासोबत आहे खास कनेक्शन?

Gabbar Jamadar’s political connection: अकोला ड्रग्ज प्रकरणातील फरार गब्बर जमादारचे पोलिसांशी असलेले वादग्रस्त संबंध उघड. वंचित बहुजन आघाडीनं संबंध फेटाळले. २ आरोपी अटकेत, २.३० लाखांचं ड्रग्ज जप्त.

Bhagyashree Kamble

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

अकोल्यातील एमडी ड्रग्ज प्रकरणातील आरोपी गब्बर जमादारचे अनेक कारनामे समोर येत आहेत. एमडी ड्रग्स विक्री प्रकरणात अकोल्यातल्या खदान पोलिसांनी बुधवारी दोघांना अटक केली होती. मात्र, या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्याप फरार असून, तो 'पोलीस मित्र' म्हणून वावरत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्याचा पोलिसांवर नोटांची ओवाळणी करत असलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून गब्बर जमादारच्या संबंधित काही पोस्ट समोर येत आहेत. एका मिरवणुकीत जमादार हा उरळ पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार गोपाल ढोले आणि PSI कायंदे नावाच्या अधिकाऱ्यांना नोटांची ओवाळणी करताना दिसत आहे. तसेच पोलिसांच्या पथसंचालनात तो पोलीस अधिकाऱ्यांसोबत चालतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

वाढदिवसाचा केक कापतांना गब्बरच्या कार्यकर्त्याच्या हाती तलवार असलेले फोटोही समोर आले आहेत. "पोलीस मित्र" म्हणून जवळीक असलेल्या गब्बरकडे पोलिसांनी दुर्लक्ष का केले? आणि केले असेल तर त्यामागचा हेतू काय? याची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे. एमडी ड्रग्स तस्करी प्रकरणात आरोप असलेल्या गब्बर जमादार हा वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आणि पोलीस मित्र असल्याची माहिती आहे.

मात्र, वंचित बहुजन आघाडीने गब्बर जमादारचा पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचा स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीने अधिकृत पत्र काढत स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, अकोल्यातल्या गौरक्षण रस्ता परिसरात पोलिसांनी बुधवारी एमडी ड्रग्स तस्करांवर कारवाई केली होती. यावेळी आरोपी मोहम्मद यासीन मोहम्मद आसिफ आणि मुस्ताक खान हादीक खान या दोघांना अटक झालीय. त्यांच्याकडून २ लाख २० हजार रुपयांचं एमडी ड्रग्स जप्त केलं होतं. ४६ ग्रॅम ३० मिली ग्रॅम एमडी ड्रग्सचं ताब्यात घेतलं होत. तर तिसरा पोलिस मित्र म्हणून असलेला हा गब्बर जमादार अद्याप फरार आहे. तसेच या प्रकरणात त्याचा सहभाग होता का? याची पडताळणी पोलिसांकडून सुरू आहे.

बड्या नेत्यांसोबत गब्बार जमादारचे फोटो व्हायरल

शिंदे शिवसेनेचे आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि आरोपी गब्बर जमादार या दोघांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तसेच माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्यासोबतचे देखील फोटो समोर आले आहे. त्यामुळे ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपी असलेला गब्बर जमादार याची राजकीय ओळख असल्याचे पार्श्वभूमी दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT