Railway TC Jumps in Front of Goods Train Saam Tv
महाराष्ट्र

Akola Crime : टीसीने रेल्वे स्थानकावरच आयुष्य संपवलं, धावत्या मालगाडीसमोर मारली उडी, धक्कादायक कारण

Railway TC Jumps in Front of Goods Train: अकोल्यात टीसीने धावत्या मालगाडीसमोर उडी मारून आत्महत्या केली. या टीसीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अटक करतील या भीतीने त्याने टोकाचे पाऊल उचलले.

Priya More

अक्षय गवळी, अकोला

अकोल्यामध्ये रेल्वे स्थानकावर टीसीने मालगाडी समोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. या टीसीवर १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अटक करतीय या भीतीने या टीसीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. या घटनेमुळे अकोल्यात खळबळ उडाली आहे.

अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे टीसीने टोकाचे पाऊल उचलत रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. सोमवारी रात्री ही घटना उघडकीस आली. कौटुंबिक कलाहातून टीसीने टोकाची भूमिका घेतल्याची माहिती समोर आली. सुमेध मेश्राम असं या आत्महत्या करणाऱ्या रेल्वे टीसीचं नाव आहे. सुमेध मेश्रावर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते. पोलिस त्यांना अटक करणार होते. पण अटकेच्या भीतीने सुमेध मेश्राम यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

४० वर्षीय सुमेध मेश्राम हे गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणामुळे तणावात होते. काल रात्री मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ वर कर्तव्य बजावत असताना सुमेध मेश्राम यांनी रेल्वे समोर उडी घेतली. मुर्तिजापूरवरून भुसावळकडे जाणाऱ्या मालगाडी समोर उडी घेतल्याने ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुर्तिजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास अकोला लोहमार्ग पोलिस करत आहेत.

सुमेध मेश्राम यांच्यावर अकोल्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, मेश्राम यांच्यावर अत्याचार, विनयभंग त्याशिवाय बाल संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे झाले होते. सुमेध मेश्राम यांनी या मुलीला घरातील सामान काढण्यासाठी बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्यांनी या मुलीला कोणाला सांगितले तर तुला आणि तुझ्या आईला जीवे मारू अशी धमकी दिली होती. त्यानंतर त्यांनी पीडितेला वेगवेगळी औषधंही दिली.

पीडित मुलीने सर्व प्रकार आईला सांगितला. तिच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिने अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलिस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर सुमेध मेश्राम यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढे हा तपास मुर्तीजापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर पोलिस सुमेध मेश्राम यांना अटक करण्यासाठी रवाना झाले होते. मात्र अटकेच्या भीतीने त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT