Akola Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Akola Crime : 'तू माझ्याशी बोलली नाही, तर मी मरतो', अल्पवयीन मुलीला दिली धमकी, आता करतोय पश्चाताप!

तक्रारदार मुलगी गावातील हातपंपावर पाणी भरण्यासाठी जात असताना आरोपी स्वप्नील बुधे याने पाठलाग केला होता.

जयेश गावंडे

Akola Crime News : एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तू माझ्याशी बोल, तू जर माझ्याशी बोलली नाहीस तर मी मरतो, अशी धमकी  (Crime) देणाऱ्या युवकाविरूद्ध पीडित मुलीच्या तक्रारीवरून अकोला (Akola) जिल्हा व सत्र न्यायालयात खटला चालला. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. बुधवारी (9 नोव्हेंबर) हा निकाल देण्यात आला.

स्वप्नील वासुदेव बुधे असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 17 वर्षीय मुलगी ही परीक्षा देण्याकरता सेंटरवर जात असताना आरोपी हा तिचा पाठलाग करत होता. तसेच ‘तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी मरतो,’ असे म्हणून तिला धमकी देत होता.

तक्रारदार मुलगी गावातील हातपंपावर पाणी भरण्यासाठी जात असताना आरोपी स्वप्नील बुधे याने पाठलाग केला होता. आपल्यासोबत बोलावं यासाठी तो सातत्याने तक्रारदार मुलीचा पाठलाग करत होता. इतकेच नव्हे तर तो मोबाइलवर मॅसेज करीत होता.

दरम्यान, आरोपी स्वप्नील याच्या कृत्याला कंटाळून अखेर मुलीने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. घडलेल्या प्रकारानंतर कुटुंबीयांनी मुलीला सोबत घेऊन थेट बोरगाव मंजू पोलीस ठाणे गाठले.

मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी (Police) आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी देताना आरोपी स्वप्नील याला तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

Nagpur: गँगस्टरच्या पत्नीसोबत अफेअर, महिलेचा मृत्यू; इप्पा गँगच्या मनात वेगळाच संशय, 'टोपी'च्या शोधात ४० लोक

Maharashtra Population: महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे?

SCROLL FOR NEXT