Akola Crime News Update SAAM TV
महाराष्ट्र

अंघोळ करताना काढले फोटो; महिलेसोबत ७-८ महिन्यांपासून घडत होतं भयंकर

अकोलामध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अकोला: अकोला येथील लोहारा परिसरात संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेचे अंघोळ करताना आक्षेपार्ह फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. अखेर पीडितेने अत्याचाराला कंटाळून थेट पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपीला ताब्यात घेतलं आहे. (Akola Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेचे अंघोळ करताना काही आक्षेपार्ह फोटो काढले होते. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने ३३ वर्षीय महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी उरळ पोलीस (Police) ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, शिवा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सात ते आठ महिन्यांपूर्वी लोहारा येथील ३३ वर्षीय महिला ही घरात अंघोळ करत असताना, आरोपी तिच्या घरात घुसला.

मोबाइलमध्ये पीडितेचे फोटो काढले. ते आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तिला चाकूचा धाक दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी जबरदस्तीने नेऊन तिच्यावर अत्याचार (Rape) केले.

आरोपी हा महिलेला ब्लॅकमेल करून तिला वारंवार धमक्या देत होता. वेगवेगळ्या ठिकाणी नेत आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. वारंवार होणाऱ्या अत्याचाराला ती वैतागली. अखेर पीडितेने उरळ पोलीस ठाणे गाठले. आरोपीविरोधात तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उरळ पोलीस ठाण्याचे अनंतराव वडतकार यांनी पोलस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मीठमुंबरी-बागवाडी जेटीवरील बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Shraddha Dubey: मॉडेलिंगच्या नावाखाली काळा धंदा! ब्लॉगरच्या फ्लॅटवर छापा पडताच समोर आला धक्कादायक प्रकार

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

ज्ञानेश कुमारांना सोडणार नाही! सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार; राहुल गांधींचा सर्वात मोठा निर्णय

Mobile Use In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होऊ शकतो मूळव्याध, आजपासून सोडा ती वाईट सवय

SCROLL FOR NEXT