Akola Crime Saam tv
महाराष्ट्र

Akola Crime : अकोल्यात शिकायचे असेल तर पैसे द्या; बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना दमदाटी, टवाळखोरांकडून एकावर हल्ला

Akola News : महाविद्यालयीन शिक्षण तसेच खासगी क्लाससाठी अनेक विद्यार्थी बाहेर गावाहून अकोला शहरात येत असतात. मात्र या विद्यार्थ्यांना त्रास दिला जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : शिक्षणाची पुरेशी सोय नसल्याने अनेक विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी येत असतात. तर बरेचजण खासगी क्लाससाठी येत असतात. मात्र अकोल्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांबाबतीत वेगळाच प्रकार घडत असनू अकोल्यात शिकायचं असेल तर पैसे दे', अशा पद्धतीने काही टवाळखोर तरुण बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसमोर असा तगादा अर्थातचं पैशाची मागणी करत आहेत. मागील काही दिवसांपासून हे प्रकार वाढले आहेत. 

महाविद्यालयीन शिक्षण तसेच खासगी क्लाससाठी अनेक विद्यार्थी बाहेर गावाहून अकोला शहरात येत असतात. मात्र या विद्यार्थ्यांना त्रास दिला जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थ्यांना दमदाटी करत चक्क पैशांची मागणी केली जात आहे. असाच प्रकार पुन्हा समोर आला आहे. अकोला जिल्ह्यातील सांगळुद येथील तीन विद्यार्थी शिकवणी क्लास करून रस्त्याने जात असताना काही टवाळखोरांनी विद्यार्थ्यांना अडवत पैशाची मागणी केली. 

थेट केला चाकू हल्ला 

दरम्यान या विद्यार्थ्यांनी पैसे न दिल्याने टवाळखोर तरुणांनी विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांचा हल्ल्याचा प्रयत्न फसला आणि घटनास्थळावरून या टवाळखोरांनी पळ काढला. सिव्हिल पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली असून या प्रकरणात विद्यार्थ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

पालकांसमोर गहन प्रश्न 

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत ५० रुपयायांसाठी एका बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची काही टवाळखोर तरुणांनी हत्या केल्याची घटना घडली होती. यानंतर हा प्रकार पुन्हा समोर आला आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना वह्या पुस्तकांसोबत अन्य काही वस्तू द्यायच्या का? असा प्रश्न पालकांसमोर पडला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT