akola crime news  saam tv
महाराष्ट्र

Akola Crime News: नववीतील मुलाचे भयंकर कृत्य! दगडाने ठेचून केली जन्मदात्या आईची हत्या; धक्कादायक कारण समोर

Akola Crime Update: काही दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यातील दहीगाव येथे महिलेचा मृतदेह सापडला होता, ज्याचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली.....

जयेश गावंडे

Akola Crime News: पोटच्या अल्पवयीन मुलानेच आईचा खून केल्याची मन सुन्न करणारी घटना अकोला (Akola News) जिल्ह्यात घडली आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. (Crime News In Marathi)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यातील दहीगाव गावंडे शेत शिवारात संगीता राजू रवाळे ( वय, ४०) या विधवा महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या महिलेच्या डोक्यावर अन् अंगावर ठिकठिकाणी दगडानं मारल्याच्या जखमा होत्या. ही भयंकर हत्या कोणी केली असावी? याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.

त्या दृष्टीने त्यांचा तपासही चालू होता. अखेर या हत्या प्रकरणाचा अकोला येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उलगडा केला. ज्यामधून धक्कादायक माहिती समोर आले आहे. या महिलेच्या हत्येमागे तिच्याच पोटच्या १५ वर्षीय मुलाचा हात असल्याचं समोर आले आहे. या हत्येचं मूळ कारण देखील समोर आले आहे. (Latest Marathi News)

पोलिसांना आरोपी मुलाने हत्येची माहिती देताना सांगितले की, आई त्याला अनेकदा ओरडायची, त्याच्यावर रागवायची. ४ जून रोजीही दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. वाद वाढल्यामुळे संतापाच्या भरात त्याने आईला संपवण्याचा कट रचला आणि आईचा दगडाने ठेचून खून केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

Maharashtra News Live Update: शक्तिपीठाविरोधात13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सद्बुद्धी दिंडी

तुकाराम मुंढेंची धडक कारवाई! दूध वाढवण्यासाठी म्हशींना दिली जात होती बंदी असलेली इंजेक्शन्स

Jennifer Winget Marriage: घटस्फोटाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाह बंधनात, नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल

Corn Appe Recipe : नाश्त्याला पोहा-उपमा खाऊन कंटाळा आला? ट्राय करा मऊशार मका आणि रव्याचे आप्पे; झटपट होईल तयार

SCROLL FOR NEXT