Dhule News: सर्पदंशाने जेसीबी चालकाचा मृत्यू; लवकर उपचार झाला नसल्‍याचा आरोप

सर्पदंशाने जेसीबी चालकाचा मृत्यू; लवकर उपचार झाला नसल्‍याचा आरोप
Dhule News Snake Bite
Dhule News Snake BiteSaam tv
Published On

पिंपळनेर (धुळे) : बोडकीखडी (ता. साक्री) येथे सर्पदंशाने जेसीबी चालकाचा मृत्यू झाला. दहिवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात (Sakri) वेळेवर उपचार व रुग्णवाहिका न मिळाल्याने त्याचा मृत्यू (Death) झाल्याचा आरोप करीत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस पक्ष व ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (Breaking Marathi News)

Dhule News Snake Bite
Aditya Thackeray Banner: आदित्य ठाकरे महाराष्‍ट्राचे भावी मुख्‍यमंत्री; वाढदिवशी लागले संभाजीनगरात बॅनर

झारखंडमधील रहिवासी असलेला कृष्णा साव हा तरुण १० ते १२ वर्षांपासून साक्री तालुक्यातील बोडकीखडी येथे जेसीबी व्यवसायानिमित्त वास्तव्यास होता. कृष्णा साव यास कानाला सर्पदंश झाल्याने त्यास दहिवेल येथील प्राथमिक (Dhule) आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होऊ शकले नाहीत. बराच वेळ थांबल्यानंतरही उपचार झाला नाही. सर्व कर्मचारी गैरहजर होते. त्यानंतर कृष्णा साव यास साक्री येथे नेण्यात आले.

Dhule News Snake Bite
Beed Crime News: तक्रार दिल्‍याने तक्रारदार शेतकऱ्यास घरात घुसून मारहाण; ६ जण जखमी

मात्र, प्रकृती गंभीर असल्याने धुळे येथे नेण्यास सांगितले. तेथे १०८ रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. दहिवेल व साक्री येथे रुग्णवाहिका न मिळाल्याने खासगी वाहनाने धुळे येथे नेत असताना नेर गावादरम्यान कृष्णा साव याचा मृत्यू झाला. धुळे येथे रुग्णालयात त्यास मृत घोषित करून विच्छेदनानंतर मृतदेह मूळ गावी झारखंडकडे रवाना करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com