Akola Crime Saam tv
महाराष्ट्र

Akola Crime : काम देण्याचे सांगत तरुणींना लोटले वेश्या व्यवसायात; अकोल्यातील धक्कादायक प्रकार, उच्चभ्रू वस्तीतील व्यवसायाचा पर्दाफाश

Akola News : मोबदल्याचे प्रलोभन देत या तरुणींना वेश्या व्यवसायात ढकलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याचा गैरफायदा घेत हा वेश्या व्यवसाय चालवल्या जात होता

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : अकोल्यातल्या उच्चभ्रू वस्तीत वेश्या व्यवसाय चालविला जात होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापेमारी करत सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा खदान पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून ३ तरुणी आणि २ महिलांची सुटका केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

अकोला शहरातील गौरक्षण रस्त्यावरील कीर्ती नगरात हा वेश्या व्यवसाय सुरू होता. याठिकाणी असलेल्या तरुणी गरिब कुटुंबातील असून त्यांना काम देण्याचे आमिष दाखवले. नंतर अधिक मोबदल्याचे प्रलोभन देत या तरुणींना वेश्या व्यवसायात ढकलण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याचा गैरफायदा घेत हा वेश्या व्यवसाय चालवल्या जात होता. पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल आणि वाहन असा एकत्रित सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दोन हजार रुपयांपर्यंत चालायचा देहविक्रीचा व्यवसाय
याठिकाणी चालविण्यात येत असलेल्या व्यवसायात ग्राहकांकडून ५०० ते २ हजार रुपये घेत या तरुणी आणि महिला देहविक्रीचा व्यवसाय चालवत असल्याचे समोर आले आहे. उच्चभ्रू वस्तीतील देहविक्रीच्या व्यवसायाबद्दल खदान पोलिसांना माहिती मिळाली. दरम्यान, सुरुवातीला मसाज पार्लरच्या नावाखाली हा गोरखधंदा चालायचा. काही दिवसातच याचे वेश्या व्यवसायात रूपांतर झालं. पोलिसांनी या ठिकाणी एक बनावट ग्राहक पाठवत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. रात्री उशिरा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला. 

जागा मालकासह दोन महिलांवर कारवाई  

पोलिसांनी अचानक धाड टाकत केलेल्या कारवाईत जवळपास दीड तास घटनास्थळावर चांगलाच गोंधळ उडाला. विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांनी अनेकदा वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेला विरोध केला, मात्र व्यवसाय चालवणारी महिला वाद घालायची. याठिकाणी छापेमारीमध्ये तरुणींसह महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच जागा मालकासह, तरुणींकडून वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या २ महिला आणि ग्राहकांवर कारवाई करण्यात आली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण करणारा परप्रांतीय अट्टल गुन्हेगार;आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या ५ टीम तयार

Maharashtra Politics: ठाकरेंना रोखण्यासाठी फडणवीसांचं मायक्रोप्लॅनिंग,ठाकरेंचा डाव भाजप कसा उलटवणार ?

Beed Crime: वाल्मीक कराड जेलमध्ये... तरी गँग अ‍ॅक्टिव्ह! सहकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, आमदारांना धमक्या आणि शिवीगाळ|VIDEO

Mumbai Local Train: मुंबई-कसारा लोकल ट्रेनवर दरड कोसळली; दोन प्रवासी जखमी

उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यामागे राजकारण?सरकार आणि धनखडांमध्ये कुठे पडली ठिणगी?

SCROLL FOR NEXT