Akola Crime Saam tv
महाराष्ट्र

Akola Crime : घरासमोर गाडी लावण्यावरून वाद; दोन गट आले समोरासमोर, दगडफेकीनंतर तणाव

Akola News : अकोला शहरातील जुने शहर या भागात सदरची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. दारात गाडी ठेवण्यावरून समोरासमोर राहणाऱ्या भिन्न समुदायातील दोघांत सुरुवातीला वाद झाला. वादाचे पर्यावरण भांडणात झाले

Rajesh Sonwane

अक्षय गवळी 

अकोला : अकोल्यातल्या जुने शहर असलेल्या परिसरात मध्येरात्रीच्या सुमारास दोन गट आमनेसामने आल्याचा प्रकार घडला. घरासमोर गाडी उभी करण्यावरून झालेल्या वादानंतर दोन परिवारातील या वादाचे रूपांतर दोन गट समोरासमोर येण्यापर्यंत आला होता. या दरम्यान किरकोळ दगडफेक देखील झाल्याचे समजत आहे. मात्र सुदैवाने पोलिसांनी लागलीच घटनास्थळीत धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. यामुळे पुढील मोठा वाद टळला आहे. 

अकोला शहरातील जुने शहर या भागात सदरची घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. दारात गाडी ठेवण्यावरून समोरासमोर राहणाऱ्या भिन्न समुदायातील दोघांत सुरुवातीला वाद झाला. वादाचे पर्यावरण भांडणात झाले. यामुळे दोघांनी आपल्या परिचयातील काही जणांना बोलावून घेतले होते. यामुळे दोन समुदायांत दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. 

वेळीच पोलीस आल्याने परिस्थिती नियंत्रणात 

जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीतील भांडपुरा चौक येथे रात्री उशिरा हा वाद निर्माण होऊन दोन गटात किरकोळ कारणावरून तणाव निर्माण झाला होता. या वादात काहींनी दगडफेक केली असल्याचे देखील समजत आहे. मात्र तणाव वाढण्यापूर्वीच सुदैवाने पोलिस दाखल झाले. यानंतर त्यांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. यामुळे शहरात मोठी दंगल निर्माण होण्याची परिस्थिती झाली होती. 

परिसरात तगडा बंदोबस्त 

जुने शहरातील भांडपुरा चौक हा परिसर वादग्रस्त असल्याने येथे तगडा पोलिस बंदोबस्त लावला गेला होता. रात्री उशिरा आरसीपी व दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले. सद्यस्थितीत घटनास्थळी तणावपूर्ण शांतता आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, अस आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : महामार्गावर अपघाताचा थरार! दुचाकी आणि प्रवाशांनी भरलेल्या बसची समोरासमोर धडक; तरुणाचा होरपळून मृत्यू

Maharashtra Live News Update: संग्रामपूर तालुक्यात वादळी पावसाचा फटका; पळशी झाशी शिवारातील मका पिकाचे मोठे नुकसान

महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या होत्या; जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याने नवा वाद

Petrol Pump Fraud Tips: कार आणि बाईकमध्ये पेट्रोल भरताना 5 गोष्टी लक्षात ठेवा, तुमची फसवणूक होणार नाही

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पत्रिका पावसात भिजल्या; विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात|VIDEO

SCROLL FOR NEXT