Akola Crime News Saam tv
महाराष्ट्र

Akola Crime News : अकोला हादरले; अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार करत दिले चटके, नराधमाला अटक

Akola News : मागील अनेक दिवसांपासुन चाकूच्या धाकावर तिला आणि तिच्या परिवाराला जीवे मारण्याच्या धमक्या देत बलात्कार करायचा

Rajesh Sonwane

हर्षदा सोनोने 
अकोला
:शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना अकोला शहरात उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे त्याने मुलीशी परिवाराला धमकी देत (Crime News) अत्याचार केला. या घटनेमुळे (Akola) अकोला शहर परिसर हादरला असून अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक करून त्याला तीन दिवसांचा पीसीआर देण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

अकोला शहरात हि धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका ११ वर्षीय मुलीवर शेजारीच राहणाऱ्या मुलाने बलात्कार केला. मागील अनेक दिवसांपासुन चाकूच्या धाकावर तिला आणि तिच्या परिवाराला जीवे मारण्याच्या धमक्या देत बलात्कार करायचा. इतकेच नाही तर हा मुलगा यावरच थांबला नसून त्या चिमुकलीच्या अंगावर सिगारेटचे चटके देऊन तिचे केसही कापले. याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर युवकाला १७ नोव्हेबरला खदान (Police) पोलिसांनी अटक करत बलात्कार व पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सदर घटनेतील आरोपीला ३ दिवसांचा पीसीआर दिला असून या प्रकरणात पोलीस अजून पीसीआर मागणार आहेत. या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती उपजिल्हा पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांनी दिली आहे. तसेच असून आरोपीला शिक्षा देण्याची मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे. तर पीडित मुलीला बालसुधारगृहामध्ये पाठवण्यात आले असून तिचे मेडिकलचे रिपोर्ट आल्यानंतर तिच्या हातावर असलेल्या जखमा विषयीचा खुलासा होईल. मात्र या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीने उडी घेतल्याने या प्रकारला आता राजकीय वळण मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आणि सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडणार

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

SCROLL FOR NEXT